ETV Bharat / state

मुंबई : भारत पेट्रोलियम कोविड सेंटरला पुरवणार 40 टन ऑक्सिजन - Bharat petroleum supply oxygen to Covid center

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. रोज ७ ते ११ हजार रुग्ण आढळून येत होते.

Bharat petroleum supply oxygen
भारत पेट्रोलिअम ऑक्सिजन पुरवठा
author img

By

Published : Apr 26, 2021, 3:25 PM IST

मुंबई - देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. अनेकांना ऑक्सिजन नसल्याने इतर रुग्णालयात हलवावे लागले आहे. ऑक्सिजनची कमतरता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशानुसार केंद्र सरकारच्या भारत पेट्रोलियम या कंपनीकडून 40 टन लिक्विड ऑक्सिजन कोविड सेंटरला पुरवला जाणार आहे.

कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवठा -

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. रोज ७ ते ११ हजार रुग्ण आढळून येत होते. गेले दोन दिवस ५ हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत, मागील आठवड्यात ऑक्सिजनची कमरता असल्याने १६८ रुग्णांना इतर रुग्णालयात हलवावे लागले होते. इतर राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णांना लागणाऱ्या लिक्विड ऑक्सिजनचे उत्पादन करण्याचे आदेश दिले आहेत. याला अनुसरून पेट्रोलियम मंत्रालयाने भारत पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये लिक्विड ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये दररोज ४० टन ऑक्सिजन निर्माण केला जाणार असून पालिकेच्या कोविड सेंटरला हा ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे.

मुंबईला लागतोय २३५ मॅट्रिक टन ऑक्सिजन -

मुंबईला दिवसाला २३५ मॅट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. हा ऑक्सिजन पुरवठादारांकडून केला जात आहे. यात कमतरता पडू नये म्हणून विशाखापट्टणम, जामनगर आणि रायगड या तिन्ही ठिकाणांहून मिळून सुमारे ५०० टन अधिकचा ऑक्सिजनचा साठा लवकरच उपलब्ध होणार आहे. ऑक्सिजनची निर्माण झालेली त्रुटी भरून काढण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठी मुंबईतील १२ ठिकाणांची निवड झाली असून त्यात प्रामुख्याने करोना जंबो सेंटरसह रुग्णालयांचाही समावेश आहे. पुढील एका महिन्यात सर्वच्या सर्व १२ केंद्रात ऑक्सिजन प्रकल्प तयार होऊन ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणार आहे. एका जंबो सेंटर वा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प तयार झाल्यावर तिथे एका तासात २ ते ५ हजार क्युबिक मीटर ऑक्सिजन उपलब्ध होईल. त्यातून एकाचवेळी २५ ते ३० रुग्णांना त्याचा पुरवठा करता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.