मुंबई : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाचा आज तिसरा दिवस आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमाच्या बससेवा बुधवारी सकाळी अचानक संपावर गेल्याने अनेक मार्गांवर बससेवा विस्कळित झाली. पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र, या शेवटच्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा होणार का? या आशेवर हे कर्मचारी बसले आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईतील वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. अनेक चाकरमान्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होत आहे.
प्रवाशांचे प्रचंड हाल : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या या संपामुळे बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मुंबईतील आझाद मैदानावर बेस्टचे कंत्राटी कामगार आंदोलन करत आहेत. घाटकोपर, मुलुंड आणि विक्रोळी डेपोमध्ये कार्यरत कर्मचारी देखील संपावर गेले आहेत. बेस्टने डागा ग्रुपसह काही कंत्राटदारांकडून बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. या अंतर्गत वाहनांची देखभाल, इंधन आणि चालकांच्या पगाराची जबाबदारी खासगी ऑपरेटरकडे सोपवण्यात आली आहे.
दररोज 3 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक : खासगी बस ऑपरेटर एसएमटीच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी सुरुवातीला बेस्टच्या घाटकोपर आणि मुलुंड डेपोमध्ये पूर्व उपनगरात काम बंद केले. त्यामुळे अनेक बस मार्गावरील सेवा प्रभावित झाली. सध्या बेस्टच्या ताफ्यात सुमारे 3 हजार 100 बस असून, बेस्ट मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या शेजारील शहरांमध्ये दररोज 3 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करते. यापैकी सार्वजनिक परिवहन मंडळाकडे 1 हजार 340 बस आहेत. तर, उर्वरित बस या भडेत्वावरील असल्याची माहिती बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. खासगी बस ऑपरेटरच्या कर्मचार्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे त्यांच्या सेवांवर नेमका किती परिणाम झाला हे बेस्टकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु काही बेस्ट कर्मचार्यांनी अनेक मार्गांवर सेवा सुरू असल्याचा दावा केला आहे. मात्र काही बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवेला मोठा फटका बसल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा -