ETV Bharat / state

बेस्ट बसच्या अपघातांची चौकशी होणार - अनिल पाटणकर

author img

By

Published : May 10, 2019, 8:48 AM IST

बेस्ट बसला अंधेरी येथे लागलेली आग आणि कुर्ला येथे झालेला अपघात या दोन्ही प्रकरणाची चौकशी करुन त्याचा अहवाल बेस्ट समितीला सादर करावा, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी दिली.

बेस्ट बसचा अपघात

मुंबई - बेस्ट बसला मागील आठवड्यात अंधेरी येथे आग लागली होती. तर आज मध्यरात्री कुर्ला येथे डबल डेकर बसचा अपघात झाला. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांची चौकशी करून बेस्ट समितीला अहवाल सादर करावा, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असल्याची माहिती बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी दिली.

अनिल पाटणकर

मागील आठवड्यात दिंडोशी डेपोची मार्ग क्रमांक ६४६ ची बस गोरेगांव स्टेशनकडून दिंडोशीकडे जात असताना गोकुळधाम मार्केट जवळ बसमधून सीएनजी गॅसची गळती झाली. गॅस गळती झाल्याने बसला आग लागली. यावेळी ड्रायव्हर, कंडक्टर आणि ३ प्रवासी प्रसंगावधान राखून बाहेर पडल्याने जीवित हानी झालेली नाही. या आगीत बसचा फक्त सांगाडा राहिला होता.

हा प्रकार ताजा असतानाच आज मध्यरात्री डबल डेकर बस बंद पडली होती. ही बस अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी मरोळ डेपोकडून कुर्ला डेपोकडे घेऊन जात असताना वाकोला ब्रिजजवळ मोठी वाहने घेऊन जाण्यास बंदीसाठी लावण्यात आलेल्या पिलरवर बसचा वरचा भाग आदळला. या अपघातात बसच्या वरच्या भागातील तीन सीटपर्यंतच्या भागांचे नुकसान झाले. या प्रकरणी अभियांत्रिकी विभागाच्या एका चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या दोन्ही अपघातांची चौकशी केली जाणार आहे. तसे आदेश प्रशासनाला दिले आहेत. सीएनजी बसची पाहणी करून अहवाल द्यावा, असे आदेशही प्रशासनाला दिले आहेत. मात्र, बेस्टचे महाव्यवस्थापक सुट्टीवर जाणार असल्याने ते सुट्टीवरून आल्यावर हा अहवाल बेस्ट समितीपुढे ठेवला जाणार आहे, अशी माहिती पाटणकर यांनी दिली.

Intro:मुंबई
बेस्ट बसला अंधेरी येथे लागलेली आग आणि कुर्ला येथे झालेला अपघात या दोन्ही प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल बेस्ट समितीला सादर करावा असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत अशी माहिती बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी दिली.Body:मागील आठवड्यात दिंडोशी डेपोची मार्ग क्रमांक ६४६ ची बस गोरेगांव स्टेशनकडून दिंडोशीकडे जात असताना गोकुळधाम मार्केट जवळ बसमधून सीएनजी गॅसची गळती झाली. गॅस गळती झाल्याने बसला आग लागली. यावेळी ड्रॉयव्हर, कंडक्टर व तीन प्रवाशी प्रसंगावधान राखून बाहेर पडल्याने जीवित हानी झालेली नाही.या आगीत बसचा फक्त सांगाडा राहिला होता.

हा प्रकार ताजा असतानाच आज मध्यरात्री डबल डेकर बस बंद पडली होती. ही बस अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी मरोळ डेपोकडून कुर्ला डेपोकडे घेऊन जात असताना वाकोला ब्रिजजवळ मोठी वाहने घेऊन जाण्यास बंदी साठी लावण्यात आलेल्या पिलरवर बसचा वरचा भाग आदळला. या अपघातात बसच्या वरच्या भागातील तीन सीट पर्यंतच्या भागाचे नुकसान झाले. या प्रकरणी अभियांत्रिकी विभागाच्या एका चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या दोन्ही अपघातांची चौकशी केली जाणार आहे. तसे आदेश प्रशासनाला दिले आहेत. सीएनजी बसची पाहणी करून अहवाल द्यावा असे आदेशही प्रशासनाला दिले आहेत. मात्र बेस्टचे महाव्यवस्थापक सुट्टीवर जाणार असल्याने ते सुट्टीवरून आल्यावर हा अहवाल बेस्ट समितीपुढे ठेवला जाणार आहे अशी माहिती पाटणकर यांनी दिली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.