ETV Bharat / state

Beautification of Mumbai : महापालिका आकस्मिक निधीतून मुंबईचे सुशोभीकरण

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या ( Mumbai Municipal Corporation Election ) पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणात सौंदर्यीकरणाची कामे सुरु ( Mumbai Municipal Corporation Beautification Works ) आहेत. त्यासाठी पालिका तब्बल १७०५ कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यापैकी पुढील ३ महिन्यांसाठी ९०० कोटी रुपये पालिकेच्या आकस्मीक निधी मधून केला ( Beautification of Mumbai ) जाणार आहे.

Beautification of Mumbai
महापालिका आकस्मिक निधीतून मुंबईचे सुशोभीकरण
author img

By

Published : Oct 27, 2022, 6:36 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या ( Mumbai Municipal Corporation Election ) पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणात सौंदर्यीकरणाची कामे सुरु ( Mumbai Municipal Corporation Beautification Works ) आहेत. त्यासाठी पालिका तब्बल १७०५ कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यापैकी पुढील ३ महिन्यांसाठी ९०० कोटी रुपये पालिकेच्या आकस्मीक निधी मधून केला जाणार ( Beautification of Mumbai ) आहे. पालिका आकस्मिक निधी मधून हा खर्च कसे करू शकते असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. तर, हे काम चांगले कसे होईल याची काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे.

Pavement beautification
फुटपाथ सुशोभीकरण

सौंदर्यीकरणासाठी आकस्मिक निधीमधून खर्च - मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर असून त्याचे सौंदर्यीकरण, सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. सौंदर्यीकरण, सुशोभीकरणाची कामे लवकर पूर्ण करा असे, आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानंतर ५० टक्के कामे डिसेंबर २०२२ अखेर पर्यंत तर, मार्च २०२३ अखेरपर्यंत सर्व कामे मार्गी लावा असे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईच्या सौंदर्यीकरणावर एकूण १७०५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यापैकी पुढील ३ महिन्याकरिता ९०० कोटी रुपये देण्याला प्रशासक असलेल्या आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या सण २०२२ - २३ च्या अर्थसंकल्पातील आकस्मीक निधीमधून हा निधी काढून वापरला जाणार आहे.

Beautification of Mumbai
मुंबईचे सौंदर्यीकरण

असे होणार आहे मुंबईचे सुशोभीकरण - मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर असून त्याचे सौंदर्यीकरण, सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभित हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे हाती घेतली आहेत. रस्त्यांचे पुनर्पृष्‍टीकरण, झेब्रा क्रॉसिंग, रस्ते दुभाजकांमधील मोकळ्या जागेत सुशोभित फुलझाडांची हिरवळीची लागवड, १५ किलोमीटर लांबीच्या फुटपाथवर स्टॅम्प काँक्रिट, आकर्षक विद्युत दिवे, अतिरिक्त जागेत शोभिवंत कुंड्या, पदपथांवर जिथे शक्य आहे तिथे नाविन्यपूर्ण, कलापूर्ण व परिसर सौंदर्य वाढविणारी आसने लावणे, पथदिव्यांचे सुशोभीकरण, विद्युत खांबांना प्रकाश योजना, अनधिकृत केबल, लटकलेल्या तारा काढून टाकणे आदी कामे केली जणार आहेत. तसेच मुंबई महानगराला इतिहासाचा वारसा असून महानगरात असलेल्या किल्ल्यांवर विद्युत रोषणाई करण्यात यावी, त्यातून पर्यटनाला अधिक चालना मिळेल. तसेच भारताचे प्रवेशद्वार असलेल्या गेटवे ऑफ इंडिया परिसराचे सुशोभीकरण ( Beautification of Gateway of India premises ) हाती घेण्यात यावी असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

Marine Drive
मरीन ड्राइव्ह

आकस्मिक निधी हा अत्यावश्यक कामासाठी - आकस्मिक निधी हा अत्यावश्यक कामासाठी वापरणे गरजेचे आहे. त्यामधून सौंदर्यीकरण कसे करू शकतात. सौंदर्यीकरण पालिकेच्या इतर निधी मधून करता येऊ शकते. मात्र सध्या पालिकेची मनमानी सुरु आहे. करदात्यांचे पैसे कुठे खर्च केले जात आहेत याची माहिती मिळणे गरजेचे आहे. पालिकेत लूट सुरु आहे. पालिकेच्या कामकाजात पारदर्शक पणा राहिलेला नाही अशी प्रतिक्रिया माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली.

Beautification Works
मुंबईत मोठ्या प्रमाणात सौंदर्यीकरणाची कामे सुरु

काम चांगले होईल याची काळजी घ्यावी - मुंबई सुंदर होतेय हे चांगले आहे. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी पालिका काम करत आहे तर ते चांगले आहे. पण त्याच बरोबर हे काम चांगले होईल याची काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया भाजपचे पालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.