ETV Bharat / state

Action on offensive poste : सावधान! तेढ निर्माण करणाऱ्या पोष्ट कराल तर होणार कारवाई, सायबर सेल सक्रिय - सायबरचे पोलीस आयुक्त संजय शिंत्रे

काही समाजकंटक सोशल मीडियावर (Social media) दोन समाजात वाद (Disputes between two societies) निर्माण होतील अशा पोस्टचा भडिमार करतात. मात्र, अशा पोस्ट हटवण्याचे काम पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे. या पोष्ट हटवल्या नंतर त्या करणाऱ्यांवर कारवाईही ( Action will be taken if a post creates a communal disharmony) करण्यात येत आहे अशी माहिती महाराष्ट्र सायबरचे पोलीस आयुक्त संजय शिंत्रे (Cyber CP Sanjay Shintre) यांनी दिली आहे.

Sanjay Shintre
संजय शिंत्रे
author img

By

Published : Apr 20, 2022, 7:43 AM IST

मुंबई - राज्यात तणावाचे वातावरण असताना कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून ( Mumbai police deleting controversy post ) सतर्कता पाळली जात आहे. मात्र, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी काही समाजकंटक सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. दोन समाजात वाद निर्माण होतील अशा पोस्टचा भडिमार सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, या पोस्ट हटवण्याचे काम देखील पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे. पोष्ट हटवण्यात आल्या नंतर त्या पोष्ट करणाऱ्यांवर त्वरीत कारवाई केली जाणार आहे.

सायबर सेलचे पोलीस आयुक्त संजय शिंत्रे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलेकी, आम्ही 22 खाती ब्लॉक करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे, अनेकांना ब्लॉकही करण्यात आले आहे.सध्याच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही जातीय तेढ पसरवणारी खाती शोधण्यास सुरुवात केली आहे. आम्ही अशा खात्यांद्वारे जातीय तेढ निर्माण होण्याच्या शक्यतेबद्दल मध्यस्थांना सूचना देतो. या मध्यस्थांमध्ये समाजमाध्यमे आणि इतरांचा समावेश आहे. आक्षेपार्ह पोष्ट काढून टाकून नंतर त्वरित कारवाई केली जाते. सायबर सेल दररोज सक्रिय आहे. मान्यवरांची बदनामी करणार्‍या सुमारे 12,000 आक्षेपार्ह पोस्ट सुमारे 2 वर्षांपूर्वी निर्दशनास आल्या होत्या, त्यापैकी 6 हजार पोष्ट मध्यस्थांनीच हटविल्या होत्या अशी माहितीही त्यांनी दिली.

  • Although Maharashtra Cyber is active every day... About 12,000 objectional posts defaming dignitaries were identified about 2 years ago, of which 6,000 were deleted by intermediaries: Sanjay Shintre, Maharashtra Cyber SP (19.04)

    — ANI (@ANI) April 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.