ETV Bharat / state

Barsu Refinery Political Story : बारसू रिफायनरी प्रकल्पाचे राजकारण पेटणार, कोकणची जनता कुणाला कौल देणार हाच कळीचा मुद्दा - सर्वाच्या मुळाशी कोकणची जनता

बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन सध्या राजकारण पेटले आहे. प्रकल्पस्थळी सुरू असलेल्या आंदोलनामुळे या प्रस्तावित रिफायनरीवरुन विविध राजकीय पक्ष आपली बाजू मांडत आहेत. कुणाचा तीव्र विरोध तर कुणाची मध्यममार्गी भूमिका दिसत आहे. मात्र या सर्वाच्या मुळाशी कोकणची जनता आपल्या बाजूने ओढण्याचीच चढाओढ दिसून येत आहे. यात प्रकल्पाचे काय होणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

Barsu Refinery Political Story
Barsu Refinery Political Story
author img

By

Published : Apr 28, 2023, 7:48 PM IST

मुंबई - सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनर प्रकल्प चर्चेत आहे. स्थानिकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. या ठिकाणी रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिकांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. तेथील लोक आपली एक इंचही जमीन या प्रकल्पाला देणार नाही असे बारसू रिफायनरीला विरोध करणाऱया नागरिकांचे म्हणणे आहे. या नागरिकांच्या बाजूने काही राजकीय पक्षांनी आपली भूमिका घेतली आहे. तर सरकार मात्र हा प्रकल्प होणार या भूमिकेवर ठाम आहे. राज्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिंदे आणि ठाकरे गट शिवसेना, मनसे तसेच इतर नेत्यांनी या प्रकल्पाबाबत आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. काही जणांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तर काही जणांनी या प्रकल्पाची बाजू घेतली आहे. तर काही नेत्यांनी सामोपचाराची भूमिका घेऊन प्रकल्पाचे काय करायचे ते ठरवावे असे मत मांडले आहे.

उद्धव ठाकरेंची भूमिका - या प्रकल्पाबद्दल बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, बारसूबद्दल माझी जी भूमिका होती, तसेच नाणारबद्दल जी भूमिका होती, ती माझी नाही तर तिथल्या लोकंची भूमिका आहे. लोकांच्या भूमिकेनुसार पर्यावरणाला हानीकारक प्रकल्प आपल्याला नको ही भूमिका घेऊन नाणारचा आणि येथील प्रकल्प नाकारत असल्याची भूमिका ठाकरे यांनी नुकतीच मांडली आहे. जर हा प्रकल्प लोकांच्या भल्यासाठी असेल, त्यांच्या हितासाठी असेल तर त्यांच्यावर दडपशाही करुन हा प्रकल्प का आणण्यात येत आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ही ग्रीन रिफायनरी असेल असे सांगितले जाते. तर मग मारझोड कशाला करताय असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेने बारसूच्या स्थानिक लोकांच्या बाजूने आपली भूमिका मांडली आहे. तसेच या प्रकल्पाला विरोध केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर रिफायनरीचा विरोध करणाऱयांची अवस्था शिंदे फडणवीस सरकार जालियनवाला बागमध्ये झालेल्या हत्याकांडासारखी करेल असा आरोप केला आहे.

भास्कर जाधव यानी केले भाजपला लक्ष्य - उद्धव ठाकरे गटाचे नेते आ. भास्कर जाधव यानीही यासंदर्भात भाजपला लक्ष्य करुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जवळ-जवळ २ ते ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पामध्ये होईल असे सांगितले जात आहे. तर एक लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होईल. तसेच अप्रत्यक्षही शेकडो रोजगार निर्माण होतील असे सांगितले जात आहे. मात्र ही गोष्ट जाहीरपणे कोकणातील लोकांच्यासमोर जाऊन भाजपचे कुणी का सांगत नाही, असा प्रश्न जाधव यांनी विचारला आहे. थेट लोकंशी भिडणे भाजप का टाळत आहे, असे सांगून शिवसेनेने यापूर्वी आणि आताही आपली भूमिका बदललेली नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेना स्थानिक लोकांच्या बरोबरच असल्याचे ते म्हणाले. भाजप मात्र त्यांच्या पक्षवाढीसाठी हे उद्योग करत असल्याचा आरोप जाधव यांनी केला तसेच त्यामध्ये त्यांना कदापी यश येणार नाही असेही जाधव म्हणाले. कोकणातील लोक समजूतदार आहेत. जर प्रकल्प आणायचा असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन त्याचे फायदे सांगून आणावा. दडपशाही करुन धाक दाखवून कुणीही कोकणात प्रकल्प उभारू शकत नाही असा दावा जाधव यांनी केला. त्याचवेळी ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी यांनी मात्र या प्रकल्पाला समर्थन देणारे ट्विट करुन खळबळ माजवली होती. लोकांच्या रोजगाराचा प्रश्न मिटण्यासाठी या प्रकल्पाला समर्थन असल्याचे ट्विट साळवी यांनी केले होते. 'कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच.... माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी त्यांच्यावर अन्याय करू नये....' हे ते ट्विट होते.

मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका - कोणताही प्रकल्प लोकांवर अन्याय करून लादणार नाही. समृद्धी महामार्ग जो आपल्या सरकारने केला, त्यालाही पूर्वी विरोध झाला होता, पण नंतर लोकांनी परवानगी दिली आणि हा महामार्ग झाला. तसंच बारसूतले शेतकरी, भूमिपुत्र यांना विचारात घेऊनच हा प्रकल्प पुढे नेला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांची भूमिका - दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरीसंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप करत आहेत. कारण बारसूला रिफायनरी व्हावी यासंदर्भातील पत्र उद्धव ठाकरे यांनीच केंद्राला पाठवले होते. आता मात्र या प्रकल्पाला ते विरोध करत आहेत. त्याचवेळी या रिफायनरीमध्ये देशातील सर्वाधिक गुंतवणूक होणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. कोणत्याही प्रदुषणाशिवाय ही रिफायनरी काम करणार आहे. ही ग्रीन रिफायनरी असणार आहे. मात्र केवळ राजकारणासाठी या रिफायनरीला विरोध केला जात आहे असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. उलट या रिफायनरीमुळे कोकणचे भविष्य बदलू शकते. या रिफायनरीमुळे १ लाख लोकांना थेट रोजगार मिळणार आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. बारसूच्या रिफायनरीमुळे आपण स्वयंपूर्ण होणार आहोत. एवढेच नाही तर आपण निर्यातदारही होणार आहोत अशी माहिती फडणवीस यांनी या प्रकल्पाबद्दल बोलताना दिली आहे. फक्त काही लोक या रिफायनरीचा विरोध करत आहेत. त्यामध्येही जर पाहिले तर त्यांचे नेते हे मुंबईतून जाऊन विरोध करत आहेत. मात्र आमची स्थानिक लोकांशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांचे रास्त मुद्दे आम्ही चर्चा करुन सोडवू अशीही भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांना बारसूमध्ये समाजविघातक गोष्टी घडवायच्या आहेत. आपण गृहमंत्री असल्याने यासंदर्भातील माहिती आपल्याकडे आहे. अशा समाजविघातक गोष्टी घडू नयेत यासाठी घटनास्थळी कलम १४४ लावण्यात आले. त्यामध्ये कोणताही दडपशाहीचा हेतू नव्हता असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलकांच्या मते येथील पर्यावरणावर विपरित परिणाम होईल. मासेमारीला मोठा फटका बसेल. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की असे काहीही होणार नाही. उलट ही रिफायनरी अत्याधुनिक असल्याने अगदीच नगण्य हानीकारक पदार्थ यातून बाहेर फेकले जातील. त्यांचेही योग्य व्यवस्थापन करण्यात येईल. त्यामुळे मासेमारीवर परिणाम होईल किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे सांगितले जात आहे, ते खोटे आहे, असे स्पष्ट मत फडणवीस यांनी मांडले आहे. हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या स्थानिक लोकांना पुढे करुन उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. तसेच लोकांच्यात नाहक संशय पसरवत असल्याचाही आरोप फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका - राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सामोपचाराची भूमिका बारसू रिफायनरीबाबतत घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच लोकांचे प्रश्न सोडवून आणि पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेऊन प्रकल्प करावा अशी भूमिका घेतली आहे. हीच गोष्ट अजित पवार यांनीही स्पष्ट केली आहे. आमचा पक्ष विकासाआड येणार नाही असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्यापूर्वी स्थानिक लोकांचे प्रश्न मार्गी लावावेत असे ते म्हणाले.

मनसेची भूमिका - बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत मनसेच्या भूमिकेत सुरुवातीला कठोरपणा राहिला असून आता ती मवाळ होईल का नाही हे येत्या ६ मे रोजी कळेल मात्र, कोकणातील प्रकल्पांबाबत राज ठाकरे यांनी यापूर्वीही भूमिका स्पष्ट केली आहे. डिसेंबरमध्ये राज ठाकरे म्हणाले होते की, कोकणात रोजगाराच्या संधी खूपच कमी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोकणातील बरीचशी घरं आज रिकामी दिसतात. कारण येथील तरुण रोजगाराच्या शोधात मुंबईत येतात. त्यामुळे कोकणात पर्यटन आणि येथे पिकणाऱ्या काजू आणि आंब्यासारख्या पिकांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प कोकणात आले पाहिजेत. यातून येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी हीच भूमिका नुकतीच मांडली आहे. ते म्हणाले की, कोकणात अशा प्रकारचे प्रकल्प येत असताना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. मात्र, असे असले तरीही येथील स्थानिकांना संपूर्णपणे विश्वासात घेऊन आणि त्यांच्यांशी चर्चा करून प्रकल्प आणले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. तसेच ६ मे रोजी राज ठाकरे यांची रत्नागिरीत सभा होणार आहे. त्यावेळी याबाबतची सविस्तर भूमिका ते मांडतील, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचा रिफायनरीला विरोध - काँग्रेसने मात्र बारसू येथील प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. यासंदर्भात नाना पटोले म्हणाले की 'रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध असताना भाजपाप्रणित शिंदे सरकार हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात असून काँग्रेस पक्ष स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सरकारने जनतेची डोकी फोडून, खोटे गुन्हे दाखल करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर सरकारलाही जशास तसे उत्तर देऊ. पटोले पुढे म्हणाले आहेत की, 'राज्यातील शिंदे सरकार बारसू प्रकल्पासाठी स्थानिकांवर जबरदस्ती करत आहे. आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात केले आहेत. आजही पोलिसांनी आंदोलकांवर बळाचा वापर केला. स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय बारसू रिफायनरी प्रकल्पाचा निर्णय सरकारने घेऊ नये अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. पण सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. सरकार जर पोलिसांच्या बळावर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांवर अन्याय, अत्याचार करणार असेल तर खपवून घेतले जाणार नाही.

या सगळ्या पक्षांच्या भूमिकांचा विचार केला तर भाजपने तसेच शिंदे गटाने प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने थेट विरोधाची भूमिका न घेता स्थानिकांचे प्रश्न मार्गी लागले पहिजेत असे म्हटले आहे. तर मनसेने स्थानिक पातळीवरील कच्च्या मालाचा वापर करुन तेथे उद्योग उभारले पाहिजेत अशी भूमिका घेतली आहे. रिफायनरीबाबत राज ठाकरे येत्या ६ मे रोजी रत्नागिरीमध्ये सभा घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. काँग्रेसने मात्र रिफायनरीला शिवसेनेप्रमाणे तीव्र विरोध केला आहे. लोकांची डोकी फोडून प्रकल्प पुढ रेटता कामा नये असे पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

एकूणच या सगळ्याच पक्षांच्या भूमिका पाहिल्या तर सगळ्यांनाच राजकीय फायद्यासाठी प्रकल्पाला विरोध किंवा समर्थन देत असल्याचे दिसत आहे. कोकणामध्ये सध्य परिस्थितीत शिवसेनेकडेच नेतृत्व जात असल्याचे दिसते. त्यामध्ये रत्नागिरीचा विचार करता पाच आमदारांच्यापैकी ४ आमदार शिवसेनेचे आहेत. मात्र त्यातील दोन आमदार शिंदे गटाचे आहेत. तर दोन आमदार ठाकरे गटाचे आहेत. त्याचबरोबर खासदार विनायक राऊत हे ठाकरे गटाचे आहेत. त्यामुळे आपली मते शिंदे गटाकडे या प्रकल्पाच्या निमित्ताने जाणार नाहीत ना, याची चिंता ठाकरे गटाला आहे. तर आपली ताकद नोकऱ्या आणि रोजगार निर्मितीतून वाढवण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदे गटाचा आहे. यामध्ये प्रकल्पाचे नेकमे काय होते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.