मुंबई - कोरोनाची परिस्थिती पाहता दुसऱ्या वर्षीही राज्य सरकारने दहीहंडी उत्सवावर निर्बंध लावले आहे. मात्र, भाजप आणि मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा पवित्रा घेतला आहे. आज सकाळपासूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काही ठिकाणी छुप्या पद्धतीने दही हंडीचे आयोजन करण्यात आले.
मनसेकडून दहीहंडीची आयोजन -
केवळ सणांमध्ये चेक करूनच हा प्रादुर्भाव वाढतो का? हिंदूंनी हिंदू चेतना साजरी करायची नाहीत का? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केला. नियम व अटी या सर्वांना समान असायला पाहिजेत. केवळ हिंदुंवर नियम अटी लादल्या जात असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर केला. यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये काही ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत दहीहंडीचे आयोजन रोखले. मात्र, राज्य सरकार केवळ हिंदू धर्माच्या सणांमध्ये आडकाठी घालत आहे. अटी शर्ती सह दहीहंडी उत्सव साजरी करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी द्यायला हवी होती. आंदोलने होतात, राजकीय पक्षांकडून जन आशीर्वाद यात्रा देखील काढली जाते. मग दहीहंडी उत्सव साजरा का करू दिला जात नाही?. राज्य सरकार हिंदू धर्म विरोधी काम करत असल्याचा आरोप मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे. बाळा नांदगावकर यांनी काळाचौकी येथे दहीहंडीचे आयोजन करून उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी पोलिसांनी बाळा नांदगावकर सह मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा भाजपचा निर्धार -
भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम हे दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी घाटकोपरकडे निघाले असता खार पोलिसांनी राम कदम यांना खारमधील राहत्या घरी थांबवले. मात्र, उत्सव साजरा करण्यासाठी घाटकोपरमध्ये जाणार असा निर्धार राम कदम यांनी केला आहे. तसेच लसींचे दोन डोस घेणाऱ्या केवळ पाच नागरिकांना एकत्र येऊन दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी राज्य सरकारने द्यायला हवी होती. मात्र, राज्य सरकारची परवानगी देत नाही. त्यामुळे आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच असा इशारा राम कदम यांनी राज्य सरकारला दिला आहे.
हेही वाचा - सरकार सणांच्या नाही, कोरोनाच्या विरोधात; मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना फटकारले
सण-उत्सवामुळे राज्यात तिसऱ्या लाटेचा केंद्र सरकारचा इशारा -
राज्यातील निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्ण संख्या काही प्रमाणात वाढू लागली आहे. तसेच राज्यामध्ये असलेले सण आणि उत्सव पाहता रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता देखील राज्य सरकारकडून वर्तवण्यात आली आहे. सण आणि उत्सव साजरे करत असताना तिसरा लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो, असे पत्र केंद्रीय स्वास्थ्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी देखील राज्य सरकारला पाठवले आहे. मात्र, तरीही राजकीय हेतूने उत्सव सण साजरे करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी द्यावी अशी भूमिका भारतीय जनता पक्ष देत असल्याचा आरोप आघाडीचा नेत्यांकडून केला जात आहे.
उत्सवाच्या नावाने राज्यात अराजकता पसरवण्याचे काम -
राज्यात सण-उत्सवाचे दिवस येत आहेत. मात्र, यात सण उत्सवाच्या माध्यमातून राज्यामध्ये अराजकता पसरवण्यात काम भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. केवळ राजकीय हेतू साधण्यासाठी ही स्टंटबाजी सुरू आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेमध्ये 60 लाख रुग्ण होण्याची शक्यता असल्याचे सांगत खुद्द केंद्र सरकारने निर्बंधाचे निर्देश राज्य सरकारला दिले आहे. 'मग लॉकडाऊन आवडे मोदींना' असं राज ठाकरे थेट का म्हणत नाही? असा सवाल आहे सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
मनसेकडून दहीहंडीची आयोजन -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये काही ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यासर्व ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत दहीहंडीचे आयोजन रोखले. मात्र, राज्यसरकार केवळ हिंदू धर्माच्या सणांमध्ये आडकाठी घालत आहे. अटी शर्तींसह दहीहंडी उत्सव साजरी करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी द्यायला हवी होती. आंदोलने होतात, राजकीय पक्षांकडून जनआशीर्वाद यात्रादेखील काढली जाते. मग दहीहंडी उत्सव साजरा का करू दिला जात नाही? राज्यसरकार हिंदू धर्मविरोधी काम करत असल्याचा आरोप मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.