ETV Bharat / state

Bank Holidays in November : बँकेतील कामे उरकून घ्या, नोव्हेंबरमध्ये 10 दिवस बँका राहणार बंद - नोव्हेंबरमध्ये 10 दिवस बँका बंद

देशातील अनेक राज्यांमध्ये नोव्हेंबरमध्ये बँका 10 दिवस बंद राहणार आहेत. बँकेच्या सुट्ट्यांनुसार तसेच वेगवेगळ्या प्रदेशात पाळल्या जाणार्‍या सणावर यानुसार ते बदलत राहणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोव्हेंबर महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या महिन्यात 10 दिवस बँका बंद राहणार ( Bank closed 10 days in November ) आहेत. यासुट्ट्यांमध्ये सर्व रविवार दुसरा आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे.

Bank Holidays in November
नोव्हेंबरमध्ये 10 दिवस बँका बंद
author img

By

Published : Nov 3, 2022, 10:46 AM IST

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये नोव्हेंबरमध्ये बँका 10 दिवस बंद राहणार आहेत. बँकेच्या सुट्ट्यांनुसार तसेच वेगवेगळ्या प्रदेशात पाळल्या जाणार्‍या सणावर यानुसार ते बदलत राहणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोव्हेंबर महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या महिन्यात 10 दिवस बँका बंद राहणार ( Bank closed 10 days in November ) आहेत. यासुट्ट्यांमध्ये सर्व रविवार दुसरा आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे.

कामाचे नियोजन करण्याचा सल्ला : रिझर्व्ह बँकेने तयार केलेल्या कॅलेंडरनुसार बँकांच्या सुट्ट्या, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट, हॉलिडे, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ अकाउंट्स अशा तीन श्रेणींमध्ये सूचित केल्या ( Bank holidays ) जातात. आरबीआयच्या कॅलेंडरनुसार, नोव्हेंबरमध्ये प्रादेशिक सुट्ट्यांमुळे बँका चार दिवस काम करणार नाहीत. यामध्ये गुरु नानक जयंती, कन्नड राज्योत्सव, सेंग कुत्स्नेम आणि कनकदास जयंती, वंगाळा उत्सव यांचा समावेश आहे. या सणांमुळे संबंधित राज्यातील स्थानिक शाखांमध्ये बँक सेवा प्रभावित होणार आहेत. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी तुमच्या बँकेशी संबंधित कामाचे नियोजन करण्याचा सल्ला दिला जातो.

नोव्हेंबर 2022 च्या बँक सुट्ट्यांची यादी : 6 नोव्हेंबरला पहिला रविवार, 12 नोव्हेंबरला दुसरा शनिवार, 13 नोव्हेंबरला दुसरा रविवार, 20 नोव्हेंबरला तिसरा रविवार, 26 नोव्हेंबरला चौथा शनिवार, 27 नोव्हेंबर : चौथा रविवार

राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्या : नोव्हेंबर 1ला कन्नड राज्योत्सव, कुट - बेंगळुरू आणि इंफाळ येथे साजरा होतो. नोव्हेंबर 8ला गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा, रहस पौर्णिमा आहे. ती भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, आणि श्रीनगर येथे साजरा होतो. 11 नोव्हेंबरला कनकदास जयंती वंगाळा उत्सव आहे तो बेंगळुरू आणि शिलाँग येथे साजरा होतो. 23 नोव्हेंबरला सेंग कुत्स्नेम शिलाँग येथे साजरा होतो. त्याशिवाय डिसेंबरमध्ये, राज्यांमधील प्रादेशिक आणि राष्ट्रीय सणांमुळे बँका सात दिवस बंद राहणार ( Banks closed seven days in December ) आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.