ETV Bharat / state

Mumbai Crime : अवैधरित्या मुंबईत वास्तव्य करणाऱ्या घुसखोर बांग्लादेशी नागरिकास अटक - Bangladeshi arrested in Mumbai

भारतात घुसखोरी करत मागील काही वर्षांपासून मुंबईच्या बोरिवाली भागात अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या एक बांगलादेशी नागरिकास बोरिवली एमएचबी कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे. जकारिया जहांगीर मुल्ला (35 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोराचे नाव आहे.

Mumbai Crime
बांग्लादेशी नागरिकास अटक
author img

By

Published : Feb 2, 2023, 5:32 PM IST

बांगलादेशी नागरिकाविषयी माहिती देताना पोलीस

मुंबई : मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून बोरिवली पश्चिमेकडील लिंक रोड परिसरात नियमितपणे ये-जा करत असल्याची बातमी गुप्त माहितीदाराकडून समजली. माहितीची खात्री करून सपोनी. सिद्धे, पोउनि डॉ. दिपक हिंडे यांना वरिष्ठांनी छाप्यासंदर्भात सूचना दिल्या. यानुसार पोलिसांनी बोरिवली पश्चिमेकडील गणपत नगर भागात सापळा लावून संशयितरित्या आढळून आलेल्या व्यक्तीस अटकाव केला. त्याच्याकडे तो भारतीय असल्याची ओळख दाखवणारे पुरावे मागितले असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्याच्या बोलीभाषेवरून तो परदेशी नागरिक असल्याची खात्री झाल्याने दोन माणसांना बोलावून संशयिताला विश्वासात घेवून त्याची चौकशी केली. यावेळी त्याने बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली आणि मागील अनेक वर्षांपासून तो मिरा रोड येथे राहत असल्याचे सांगितले. मुंबईत तो कडिया म्हणून काम करत असल्याचेही कबूल केले. तो बांग्लादेश मार्गे भारताच्या सरहद्दीवरील गस्ती पथकाची नजर चुकवून मुलखी अधिकान्याच्या परवानगीशिवाय भारतात प्रवेश करुन कलकत्ता मार्गे मुंबईत प्रवेश केल्याचे सांगितले.

आरोपीला अटक : आरोपी विरुद्ध पारपत्र (भारतात प्रवेश) नियम 1950 चे कलम 3 (अ) 6 (अ) सह परकीय नागरिकांचा कायदा 1946 चे कलम 14 अ अन्वये बोरिवली एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत, त्याला 1 फेब्रुवारी रोजी अटक केल्याची माहिती दिली. पुढील तपास एम एच बी कॉलनी पोलीस करत आहेत. गोपनीय माहितीप्रमाणे बांगलादेशी घुसखोर इसम हा गणपत पाटील नगर, न्यू लिंक रोड, बोरीवली पश्चिम, मुंबई या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे या ठिकाणी एका संशयित इसमास सापळा रचून अटक करण्यात आली. त्याच्या एकंदर बोली भाषेवरुन तो परदेशी नागरिक असल्याची खात्री झाल्याने दोन पंचांना पाचारण करून त्यांच्या समक्ष त्याला विश्वासात घेवून त्याची चौकशी केली असता त्याचे नाव जकारिया जहांगीर मुल्ला (वय 35 वर्षे, देश- बांगलादेश) असे सांगितले. तसेच तो मुळचा बांग्लादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा : Shubhangi Patil On Graduate Election : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत वारशाने नव्हे तर कामाने आमदार होणार - शुभांगी पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.