मुंबई : मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ही घोषणा केली. तसेच केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या राज्यातील शूरवीर आणि वीरांगणांना स्वातंत्र्यवीर सावरकर वीरता पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सावरकर जयंती निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहिली.
-
#WATCH | "Bandra-Versova sea-link bridge will be named after VD Savarkar and will be known as Veer Savarkar Setu," announces Maharashtra CM Eknath Shinde on the occasion of #SavarkarJayanti pic.twitter.com/la9RbZlLf8
— ANI (@ANI) May 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | "Bandra-Versova sea-link bridge will be named after VD Savarkar and will be known as Veer Savarkar Setu," announces Maharashtra CM Eknath Shinde on the occasion of #SavarkarJayanti pic.twitter.com/la9RbZlLf8
— ANI (@ANI) May 28, 2023#WATCH | "Bandra-Versova sea-link bridge will be named after VD Savarkar and will be known as Veer Savarkar Setu," announces Maharashtra CM Eknath Shinde on the occasion of #SavarkarJayanti pic.twitter.com/la9RbZlLf8
— ANI (@ANI) May 28, 2023
वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव दिले जाईल आणि तो ब्रीज वीर सावरकर सेतू म्हणून ओळखला जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी गाजवलेले शौर्य पाहता राज्य शासनामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
हा पूल वर्सोवाला वांद्रे-वरळी सी लिंकशी जोडेल : वर्सोवा-वांद्रे सी लिंक (VBSL) बांधकामाधीन पूल आहे. हा 17.17 किलोमीटर लांबीचा पूल अंधेरीच्या उपनगरातील वर्सोवाला वांद्रे येथील वांद्रे - वरळी सी लिंकला जोडेल. या 8 - लेन सी लिंकमुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे. मुख्य सी लिंक ब्रिजची लांबी 9.60 किमी आहे आणि प्रत्येक दिशेने 4 लेन आहेत. यात 24 लेन टोल प्लाझा देखील आहे. मुख्य पुलाच्या दोन्ही टोकाला असलेले कनेक्टर वांद्रे आणि वर्सोवा यांना जोडतात. वांद्रे कनेक्टर 1.17 किमी लांबीचा असून प्रत्येक दिशेने 2 लेन आहेत, तर वर्सोवा कनेक्टर 1.80 किमी लांबीचा असून प्रत्येक दिशेने 3 लेन आहेत. वर्सोवा कनेक्टरमध्ये 18 लेन टोल प्लाझा आहे.
2052 पर्यंत टोल वसूली केली जाईल : 2012 मध्ये या प्रकल्पाची किंमत 4,045 कोटी रुपये इतकी होती. 2013 मध्ये ती 4,340 कोटी आणि 2014 मध्ये 5,975 कोटी रुपये इतकी वाढली. बांधकामाच्या वेळी खर्च 6,993.99 कोटी रुपये होता. एका अहवालानुसार, प्रकल्पाची किंमत 2023 पर्यंत 11,332.81 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सी लिंकवर 2052 पर्यंत टोल वसूल केला जाईल. वर्सोवा वांद्रे सी लिंक वांद्रे-वरळी सी लिंकपेक्षा तिप्पट लांब असल्याने टोलचे दरही तिप्पट असणे अपेक्षित आहेत.
हे ही वाचा :