ETV Bharat / state

मुंबई : वांद्रे टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेस २ डबे सोडून पुढे पळाली

author img

By

Published : Feb 12, 2021, 2:45 AM IST

वांद्रे टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेस दोन डबे सोडून पुढे पळाल्याची धक्कादायक घटना काल सकाळी जोगेश्वरी आणि राम मंदिर रेल्वे स्थानकादरम्यान घडली. सुदैवाने यात कसलीही दुर्घटना आणि जीवितहानी झालेली नाही.

Railways
रेल्वे

मुंबई - वांद्रे टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेस दोन डबे सोडून पुढे पळाल्याची धक्कादायक घटना काल सकाळी जोगेश्वरी आणि राम मंदिर रेल्वे स्थानकादरम्यान घडली. सुदैवाने यात कसलीही दुर्घटना आणि जीवितहानी झालेली नाही. मात्र, पश्चिम रेल्वे मार्गावर घडलेल्या या घटनेमुळे प्रवासी सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हेही वाचा - केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढली; मुंबई विमानतळावर प्रवाशांची तपासणी

अशी घडली घटना

काल वांद्रे टर्मिनसहून रामनगरसाठी एक्स्प्रेस रवाना झाली. या एक्स्प्रेसला रिकामा डबा बंद करून जोडण्यात आला होता. पहाटे, 5 वाजून 27 मिनिटांच्या सुमारास जोगेश्वरी-राम मंदिर स्थानकादरम्यान गाडी धावत असताना जोरदार आवाज झाला. एक्सप्रेसचे बंद असलेले शेवटचे दोन डबे निसटले. हे समजताच एक्सप्रेस थांबविण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी पोहचले. सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी हे डबे जोडून एक्सप्रेस रवाना करण्यात आली. मात्र, सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी नायगाव-वसई रोडला एक्सप्रेस पोहचताच पुन्हा डबे निसटले. शेवटी निसटलेले डबे बाजूला करत एक्स्प्रेस रवाना करण्यात आली, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रेल्वेने दिले चौकशीचे आदेश

पश्चिम रेल्वेकडून या दुर्घटनेबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. डबे निसटले, डबे पूर्णपणे जोडल्याशिवाय गाडी रवाना कशी झाली? एकदा दुर्घटना होऊन पुन्हा तीच दुर्घटना कशी झाली, एक्स्प्रेस रवाना होण्यापूर्वी याची तपासणी कोणत्या अधिकाऱ्याने केली होती, याची चौकशी होणार आहे. या चौकशीचा अहवाल पुढील तीन दिवसात सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. या दुर्घटनेला दोषी असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल सेवेला फटका

या दुर्घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, लोकलच्या गर्दीच्या वेळी हा प्रकार झाल्याने लोकल फेऱ्यांवर परिणाम झाला. विरार आणि बोरिवलीहून चर्चगेटकडे येणाऱ्या जलद मार्गावरील लोकल खोळंबल्या होत्या. तसेच, याचा परिणाम पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवेच्या वेळापत्रकावर पडला असून अनेक कर्मचाऱ्यांना लेट मार्क लागला आहे.

हेही वाचा - शिवजंयती साधेपणाने साजरी करा; राज्य सरकारचे नागरिकांना आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.