मुंबई - सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार केला नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी 'सिल्वर ओक'वर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा - 'गांधी कुटुंबाची 'एसपीजी' सुरक्षा काढण्याचा निर्णय राजकीय सूडबुद्धी व द्वेषातून'
विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याबाबत भाजप, शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत खलबतं सुरू असतानाच महायुतीतील एक घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शरद पवारांची सकाळी भेट घेतली होती. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे.
हेही वाचा - राज्याने ठरवावे खरे बोलणारे हवेत की खोटे बोलणारे? - उद्धव ठाकरे
यावेळी बोलताना थोरात म्हणाले, मुख्यमंत्र्यांचं आणि उद्धव ठाकरेंचेही निवेदन ऐकले. सध्या राज्यपाल कोणते पाऊल उचलणार याकडे आमचे लक्ष लागले आहे. शरद पवारांचे मार्गदर्शन हे सातत्याने घेत असतो. युतीने सरकार तयार करायला पाहिजे होते. मात्र, ते त्यांनी केले नाही. त्यामुळे आजच्या या अस्थिरतेच्या परिस्थितीला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप थोरात यांनी केला.