मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैल चित्राचे अनावरण सोहळ्यासाठी आज विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी, अनेक कलाकार तसेच विविध देशांचे वाणिज्य दूध देखील या प्रसंगी हजर राहिले. दरम्यान, सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विरोधी पक्षनेता अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे तसेच विधान परिषदेचे उपसभापती नीलम ताई गोरे अशा अनेक मान्यवरांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
बाळासाहेबांच्या हाती रिमोट कंट्रोल : या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे रिमोट कंट्रोल चालवत होते. मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी नाही जनतेच्या हितासाठी ते रिमोट कंट्रोल चालवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो किंवा मराठी अस्मितेचे रक्षण बाळासाहेबांनी शिवसेनेकांची अवेध्य अशी ही कार्यकर्त्यांची फळी उभारली. छत्रपती शिवरायांना बाळासाहेब दैवत मानत व दैवत समान देवाची पूजा जर आम्ही करत असू तर सर्वांना आनंद व्हायला पाहिजे. मी आज राजकारणावर बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका देखील केली.
हिंदुत्ववादी असामान्य नेतृत्व : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे हे सत्तेसाठी कधीच नव्हते. एका प्रकरणामुळे हक्क भंग नोटीस दिल्यामुळे बाळासाहेबांना या विधानभवनामध्ये यावे लागले होते. मात्र त्यांनी सत्तेच्या पलीकडे जाऊन सर्व जनतेशी जाती-धर्मात्या लोकांची आपली नाळ जोडली आणि ते प्रकार हिंदुत्ववादी असे एक असामान्य नेतृत्व होते, अशा विशेषणांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भातील आठवणींना उपमुख्यमंत्र्यांनी उजाळा दिला.
बाळासाहेब सर्वसामान्यांचे नेते : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांना सर्व जाती धर्मातले लोक मानत होते. जो भारत विरोधी आणि पाकिस्तानची बाजू घेणार होता अशांना बाळासाहेब विरोध करीत होते. मात्र, जाती धर्माच्या पलीकडे जात बाळासाहेब सर्वसामान्यांचे नेते होते. बाळासाहेब ठाकरे यांचे वागणे आणि बोलणे अत्यंत परखड आणि पारदर्शी होते. ओठांमध्ये एक आणि पोटात एक असे बिलकुल नव्हते त्यामुळे बाळासाहेबांची ही ओळख असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
बाळासाहेब खरे लोकशाहीवादी : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले, बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलत असताना बाळासाहेब अखंड महाराष्ट्रवादी होते आणि त्यांना कोणत्याही पदाची अभिलाषा नव्हती. यापेक्षा लोकशाहीवादी कोण असू शकते तसेच बाळासाहेब कोणताही धर्म अथवा जातीवरून कोणाला न्याय देत नव्हते, त्यामुळे त्यांच्या इतका धर्मनिरपेक्ष देखील कोणी पाहिला नाही, अशा शब्दात नार्वेकरांनी बाळासाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले.
मी जो काही आहे तो बाळासाहेंबामुळेच : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील बाळासाहेबांच्या आठवणी संदर्भात त्यांच्या भेटी संदर्भात मनोगत व्यक्त केला त्यांनी सांगितलं की मी आज जो काही आहे तो बाळासाहेबांमुळेच आहे. पंधरा वर्षाचा असताना 1966 मध्ये11 शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मराठी जनतेच्या हक्कासाठी संघटना असल्यास वाटले आणि त्यामध्ये आम्ही सामील झालो आणि शिवसेनेत प्रवेश झाला. आज जे काही आहे ते बाळासाहेबांमुळेच आहे, आम्हाला बाळासाहेबांचे वेड होते, असे देखील त्यांनी सांगितलं.
बाळासाहेबांचे आपल्यावर ऋण : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सांगितले की, देशाचे आणि देवाचे तसेच मार्गदर्शक गुरूचे आपल्यावर ऋण असते तसेच शिवसेनाप्रमुख यांचा देखील आपल्यावर ऋण आहे. त्यामुळे आपण त्यांच्याकडून अनेक गोष्टी घेतल्या पाहिजे. बाळासाहेब ठाकरे अत्यंत प्रखर होते परंतु ते कनवाळू देखील होते.
उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीबद्दल चर्चा : महाराष्ट्र विधान भवनाच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या तैलचित्रांचा अनावरण सोहळा विधानभवनाच्या सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे. या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांना शेवटपर्यंत निमंत्रण आहे किंवा नाही याबाबत अनेक चर्चा झाल्या. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबतच आमंत्रण पाठवले असल्याचा खुलासा माध्यमांकडे केला होता. तसेच उद्धव ठाकरे यांना दूरध्वनीद्वारे आमंत्रण देखील दिल्याचे त्यांनी सांगितले होते.
उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती : बॉलीवूड अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभेच्या उपसभापती नीलम ताई गोरे तसेच निहार ठाकरे सहकुटुंबासह या तैलचित्र अनावरण सोहळ्यामध्ये उपस्थिती लावली. उद्धव ठाकरे या सोहळ्यासाठी हजर राहणार का याबाबतची महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये तसेच बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता होती. मात्र उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही हे दुपारच्या सुमारास समजले.
विविध देशांचे जनरल कौन्सिल उपस्थित : बाळासाहेब ठाकरे तैलचित्र अनावरण सोहळ्यामध्ये विविध देशांचे जनरलिट प्रतिनिधी देखील सहभागी झाले आहेत. जर्मनी अचेंम फेबिग, रशियाचे अलेक्सी व्ही सुर्वेसताव तसेच ऑस्ट्रेलिया, सिंगापूर ,जपान, इटली, इजराइल, द. कोरिया, श्रीलंका, कॅनडा, इंग्लंड यांचे जनरल कौनसिलेट हजर झालेले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्वभाव आक्रमकता आणि विचारांना साजेशी तैलचित्र तयार व्हायला हवे, यासाठी चार विविध कलावंतांना तेल चित्र तयार करण्याचे काम देण्यात आलेले आहे.
हेही वाचा : Bal Thackeray Jayanti 2023: वारशाच्या लढाईत साजरी होत आहे बाळासाहेबांची ९७वी जयंती