मुंबई : मुंबईतील व्यावसायिकाला जामीन मंजूर केला आहे. आरोपीने मोलकरणीच्या हाताला पाण्याचा ग्लास घेताना स्पर्श केल्यामुळे (Touching maid hand Case) आरोपी विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल (sexual assault case filed) करण्यात आला होता. एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात अटक केल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. (Latest news from Mumbai) 11 डिसेंबर 2022 रोजी एन एम जोशी मार्ग पोलिस स्टेशनने कलम 354 आयपीसी सोबत लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा, 2012 च्या कलम 8 आणि 12 नुसार एफआयआर नोंदवला (bail granted by POCSO court) होती. (Mumbai Crime)
मोलकरनीने नोंदविला एफआयआर : एफआयआरमध्ये मोलकरीण पीडित मुलीने आरोप केला आहे की, काही दिवसांसाठी पाहुणे म्हणून आलेल्या आरोपीने तिला एक ग्लास पाणी आणण्यास सांगितले होते. पीडित तरुणीने हातात पाण्याचा ग्लास आणला असता आरोपीने हातातून ग्लास घेत असतानाच आरोपीने त्याला हात लावला. त्या आधारे मोलकरणीने आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
हाताला स्पर्श करणे गुन्हा नाही : आरोपींतर्फे वरिष्ठ वकील आभा सिंग आणि वकील आदित्य प्रताप यांनी युक्तिवाद केला होता. वकील आभा सिंग यांनी युक्तिवाद करताना असे म्हटले की आरोपी विरोधात एफआयआरमध्ये POCSO कायद्याच्या कलम 8 आणि 12 अंतर्गत कोणताही गुन्हा उघड करण्यासाठी काहीही पुरावे नाही. पीडित तरुणी कडून पाण्याचा ग्लास घेताना अनवधानाने मोलकरणीच्या हाताला स्पर्श करणे हा POCSO कायद्याच्या कलम 8 नुसार गुन्हा ठरत नाही असा युक्तिवाद केला होता. आरोपीने कायद्याच्या कलम 8 मध्ये म्हटल्याप्रमाणे पीडित तरुणीच्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श केला नव्हता. आरोपीचा यात कोणताही लैंगिक हेतू नव्हता. या एफआयआरमध्ये आरोपीच्या कोणत्याही लैंगिक हेतूचे संकेत देणारे काहीही उघड केले नाही. FIR मध्ये प्रक्रियेचा दुरुपयोग आणि अर्जदारावर झालेला घोर अन्याय दर्शविला आहे. वकील आभा सिंग आणि आदित्य प्रताप यांनी असे म्हटले की एफआयआर म्हणजे निरपराध व्यक्तींना खोट्या प्रकरणात अडकवण्याचे साधन आहे. अशा एफआयआरची नोंद करण्यासाठी पोलिसांवर जबाबदारी लादली गेली पाहिजे.
घटनांचा गैरवापर : वकील आभा सिंग आणि आदित्य प्रताप यांनी असे सादर केले की अर्जदार पूर्णपणे निर्दोष आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हातातून पाण्याचा ग्लास घेतला जातो तेव्हा प्रक्रियेदरम्यान त्याला स्पर्श करणे बंधनकारक असते. निरपराध व्यक्तींवर पॉक्सो कायद्यांतर्गत खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांकडून अशा घटनांचा गैरवापर केला जातो असेही युक्तिवाद दरम्यान म्हटले आहे.