मुंबई - जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महात्मा फुलेंचा आसूड सगळ्या मंत्र्यांवर ओढला पाहिजे, असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी विधानसेभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून अपेक्षा केली. १५ वर्षात आम्हाला बोलण्यासाठी फक्त २ मिनीटे मिळतात. समोरच्या सदस्याला मात्र, अर्धा तास मिळतो. त्यामुळे सभागृहातील सर्व सदस्याचे स्थान सारखेच आहेत. त्यामुळे आपण भेदभाव करु नये. मागच्या नानाचे (हरिभाऊ बागडे) अनुभव आमच्यासाठी चांगले नसल्याचे बच्चू कडू म्हणाले.
नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बच्चू कडू बोलत होते. यावेळी त्यांनी नाना पटोले यांचे आभार मानले. आपल्याकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नेत्याकडे सभागृहातील सर्वाच्च आले असल्याचे पटोले म्हणाले. हे सभागृह फक्त ३ पार्टीचे नाही. हे सभागृह फक्त ३ पार्टीच नाही. त्यामुळे आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे असे बच्चू कडू म्हणाले.