ETV Bharat / state

गर्दी टाळा..  अतिमहत्वाचे काम असेल तरच घरातून बाहेर पडा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन - uddhav thackaray

देशातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर खबरदारी म्हणून राज्य सरकार अनेक उपाययोजना राबवताना दिसत आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवावी, अति महत्त्वाचे काम असल्यास घरातून बाहेर निघावे असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी टाळा

author img

By

Published : Mar 18, 2020, 9:41 AM IST

Updated : Mar 18, 2020, 10:18 AM IST

मुंबई - जगभरात, तसंच देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41 वर पोहोचली आहे. मुंबई परिसरात कोरोनाचे 15 रुग्ण आहेत. दुबईहुन परतलेल्या 64 वर्षीय रुग्णाचा काल मृत्यू झाला. यामुळे राज्य सरकार अनेक उपाययोजना राबवताना दिसत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी टाळा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवावी, अति महत्त्वाचे कामं असल्यास घरातून बाहेर निघावे, असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. तर, खबरदारीचा उपाय म्हणून ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालय, मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच देशातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशातील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या 138 वर पोहचली आहे.

हेही वाचा - CORONA VIRUS : मुंबईतील ऑर्केस्ट्रा, डिस्कोथेक्स, डान्सबार, पब्स ३१ मार्चपर्यंत बंद

हेही वाचा - Coronavirus : सॅन फ्रान्सिस्कोमधील 131 भारतीयांची मायदेशी परतण्यासाठी केंद्र सरकरकडे याचना

Last Updated : Mar 18, 2020, 10:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.