मुंबई - पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ४० कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जरी जप्त करण्यात आली होती. तरी नुकतेच अविनाश भोसले यांनी मुंबईतील पॉश परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपियनसी रोडवर एकशे १०३ कोटी रुपयांचा डुप्लेक्स फ्लॅट विकत घेतल्याचे समोर आले आहे.
असे आहे घर -
या डुप्लेक्स घराचा १०३ कोटी ८० लाख रुपयांमध्ये व्यवहार करण्यात आलेला असून १४ मे रोजी या घराची नोंदणी करण्यात आलेली आहे. या घरासाठी अविनाश भोसले यांनी तब्बल ३ कोटी ४० लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे. तब्बल ७ हजार ११८ स्क्वेअर फुटांचे हे घर असून या घराला ३५०३ स्क्वेअर फुटांचे टेरेस आहे. याबरोबरच या डुप्लेक्स फ्लॅट सोबत ५ गाड्यांची राखीव पार्किंग सुद्धा देण्यात आलेली आहे.
ईडीकडून झाली होती मोठी कारवाई -
दरम्यान सोमवारी ईडीकडून अविनाश भोसले यांची ४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायदा 1999 नुसार ही कारवाई करण्यात आलेली होती. अविनाश भोसले यांच्या संपत्ती विषयी ईडीकडून या अगोदर तपासणी केली जात असताना बऱ्याच ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली होती. अविनाश भोसले यांची काही महिन्या अगोदर यासंदर्भात चौकशी सुद्धा करण्यात आलेली होती. जी संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. त्यामध्ये क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड मधील इक्विटी शेअर असून काही फाइव स्टार हॉटेल मधली गुंतवणूक, याबरोबरच नागपूर व गोव्या मधल्या संपत्तीच्या गुंतवणुकीसंदर्भात ही कारवाई करण्यात आलेली आहे.
हेही वाचा - बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई