मुंबई: मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकाजवळ काल रात्री गदग एक्सप्रेस ने त्याच मार्गावरून जाण्याचा चालुक्य एक्स्प्रेस ला धडक दिल्या मुळे चालुक्य एक्सप्रेसचे ३ डब्बे रूळावरून घसरले. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी काल रात्रीपासून हे घसरलेले तीन डब्बे रुळावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. रात्री पूर्ण ठप्प असलेली रेल्वे वाहतूक स्लो ट्रॅकवर सुरू आहे मात्र प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
घसरले डब्बे काढण्याचे काम रात्रीपासून सुरू आहे. आता त्यातील दोन डब्बे बाहेर काढण्यात यश आले असून तिसरा डब्बा बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर रेल्वे वाहतूक सेवा सुद्धा हळुहळु पूर्वपदावर येत आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत ही रेल्वेसेवा पूर्णपणे पूर्वपदावर येईल अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.