ETV Bharat / state

जे जे रूग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील 900 कामगार सोमवारपासून जाणार संपावर - जे जे रूग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचारी कामबंद आंदोलन

सोमवारपासून जे जे रूग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी कामबंद आंदोलन करणार आहेत. त्यामुळे येथील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. 'चतुर्थ श्रेणी वर्गात कंत्राटी पदभरती करू नये. सरळ सेवा पध्दतीने भरती करावी आणि आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्य द्यावे', अशा मागण्या राज्य शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या आहेत.

mumbai
मुंबई
author img

By

Published : May 14, 2021, 9:11 PM IST

मुंबई - मुंबईतील महत्त्वाच्या आणि सर्वात मोठ्या अशा जे जे रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सोमवारपासून (18 मे) कोलमडण्याची शक्यता आहे. कारण सोमवारपासून जे जे रूग्णालयातील मधील 900 चतुर्थ श्रेणी कर्मचारी कामबंद आंदोलन करणार आहेत. चतुर्थ श्रेणी वर्गात कंत्राटी पदभरती करू नये आणि सरळ सेवा भरती करत कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. याची माहिती जे जे रूग्णालयातील राज्य शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना अध्यक्ष काशिनाथ राणे यांनी दिली आहे.

जे जे रूग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील 900 कामगार सोमवारपासून जाणार संपावर

कर्मचारी भरतीस विरोध

'कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणामधील मनुष्यबळ वाढवण्यासाठी कंत्राटी पध्दतीने कामगार भरती करण्यात आली आहे; शिवाय भरती केलीही जात आहे. पण जे जे रूग्णालयात कंत्राटी पध्दतीला जोरदार विरोध करण्यात आला आहे. त्याचवेळी येथील चतुर्थ श्रेणी कामगारांची रिक्त पदे सरळ सेवा पध्दतीनेच भरा. त्यातही आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्य द्या, अशी मागणी आमची आहे', असे राणे यांनी म्हटले आहे.

'या मागणीसाठी आम्ही सर्व स्तरावर पाठपुरावा करत आहोत. काही दिवसांपूर्वी वरिष्ठांनी एक बैठक घेत याबाबत ठोस पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले. पण पुढे काहीच केले नाही. त्यामुळे आता आम्ही शेवटचा पर्याय म्हणून कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे', असेही त्यांनी सांगितले आहे.

वॉर्डबॉय, शिपाई आणि सफाई कामगारांचा आंदोलनात समावेश

चतुर्थ श्रेणी कामगारांमध्ये सफाई कामगार, शिपाई आणि वॉर्डबॉय यांचा समावेश आहे. हे कामगार रुग्णालयातील महत्त्वाचा घटक आहेत. तेव्हा असे 900 कामगार एकाचवेळी कामबंद आंदोलनात सहभागी झाल्यास जे जे रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. जे जे नॉन कोविड रुग्णालय आहे. येथे मोठ्या संख्येने रुग्ण दाखल आहेत. रोज राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध आजराचे रुग्ण येथे उपचारासाठी येतात. कोविडचाही एक वॉर्ड येथे आहे. त्यामुळे या सर्व व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

'कोरोना परिस्थितीचे भान आम्हाला आहे. तर नॉन कोविड रुग्णांचीही काळजी आम्हाला आहे. पण आता आमच्याकडे पर्याय नाही. तेव्हा आम्ही सोमवारपासून कामबंद आंदोलन करत असल्याचे प्रशासनाला कळवले आहे. त्यांनी तोपर्यंत ठोस पावले उचलावीत. अन्यथा पुढे जे काही होईल त्याला संघटना जबाबदार नसेल' असेही संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा - कोविडमधून बरे झाल्यानंतरचा अशक्तपणा : कारणे आणि उपाय...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.