ETV Bharat / state

Sessions Court : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांना 'या' कारणावरून सत्र न्यायालयाने फटकारले - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Assembly Speaker Rahul Narvekar ) आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा ( Minister Mangal Prabhat Lodha ) विरोधी पक्षात असताना कोरोना काळामध्ये वाढीव वीजबिले आकारण्यात आली होती. त्यावेळी बेस्ट विरोधात आंदोलन केल्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी दरम्यान गैरहजर राहिल्याने सत्र न्यायालयाने दोन्हीही नेत्यांना फटकारले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 26, 2022, 10:42 PM IST

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Assembly Speaker Rahul Narvekar ) आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा ( Minister Mangal Prabhat Lodha ) विरोधी पक्षात असताना कोरोना काळामध्ये वाढीव वीजबिले आकारण्यात आली होती. त्यावेळी बेस्ट विरोधात आंदोलन केल्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी दरम्यान गैरहजर राहिल्याने सत्र न्यायालयाने दोन्हीही नेत्यांना फटकारले आहे. खटला प्रलंबित असताना गुजरात निवडणुकीत प्रचाराला जाणे आवश्यक आहे का? , असा प्रश्न देखील न्यायालयाने विचारला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण - कोरोनामुळे 2020 मध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीत वाढीव वीजबिले आकारण्यात आली होती. यामुळे नागरिक हवालदिल झाले होते. त्या वेळी नार्वेकर लोढा यांच्यासह भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले होते. तसेच बेस्टच्या महाव्यवस्थापकांना रोखण्याचा प्रयत्नही केला. याबाबत फौजदारीसह विविध कलमांतर्गत लोढा आणि नार्वेकर यांच्यासह अन्य 20 जणांवर विरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आले आहेत. सध्या त्यावर न्यायालयात न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर आरोप निश्चितीवर सुनावणी सुरू आहे.

गुजरात निवडणुकींच्या प्रचारामुळे उपस्थित - मुंबई सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीला विधान परिषद अध्यक्ष मिलिंद नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह भाजपचे 11 कार्यकर्ते गैरहजर राहिले आहे. त्यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर पुढील सुनावणीला सर्व जण न्यायालयात हजर राहतील अशी हमी ॲड. मनोज गुप्ता यांनी न्यायालयाला दिली. त्याची नोंद घेत न्यायालयाने 21 डिसेंबरला सुनावणी निश्चित केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असले तरी आरोप निश्चित करण्यात आले नाही तर आरोपींनी आरोपमुक्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र हा अर्ज नंतर मागे घेण्यात आला. त्यामुळे आता न्यायालयाला आरोप निश्चित करण्याची कार्यवाही पूर्ण करावी लागत आहे.

गुजरात निवडणुकींच्या प्रचारामुळे अनुपस्थित - भाजप नेत्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे न्यायालयाचे कामकाज अपूर्ण राहत आहे, असे न्यायालयाने म्हटले. आरोपीच्या वकिलांकडे न्यायालयाने गैरहजेरीबाबत विचारणा केली असता ते गुजरात निवडणुकीच्या कामासाठी गेल्याची माहिती ॲड. मनोज गुप्ता यांनी दिली. त्यावर खटला न्यायप्रविष्ट असताना ते गुजरातच्या निवडणुकीत गेले हे कारण योग्य आहे का ? हे अधिकृत काम नाही का ते नेमके कोणत्या अधिकृत कामासाठी गेले आहेत आणि कधीपर्यंत गैरहजर आहेत याचा तपशील दाखल करा, असे न्यायालयाने खडसावले. ते कोणत्या अधिकृत कामासाठी गेले त्याची माहिती नाही परंतु त्यांना खटल्याच्या गांभीर्याची माहिती देण्यात आली आहे, असे ॲड. गुप्ता यांनी न्यायालयात सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.