ETV Bharat / state

निवडणुकीत महाराष्ट्राच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा व्हावी -  अशोक चव्हाण - ashok chavan bjp

महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या. महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण
author img

By

Published : Sep 21, 2019, 6:23 PM IST

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत शेती, रोजगार, आर्थिक मंदी, ढासळलेली अर्थव्यवस्था अशा जनतेशी निगडित ज्वलंत प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

राज्याच्या ज्वलंत मुद्यांवर भाजप-शिवसेना सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. हे अपयश लपवण्यासाठी कदाचित सरकार भावनिक मुद्दे उपस्थित करून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करेल. पण काँग्रेसचे कार्यकर्ते सरकारला जनतेच्या रोजच्या जीवनातील ज्वलंत प्रश्नांवर उत्तर द्यायला भाग पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - दिवाळीपूर्वीच निवडणुका; २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ला मतमोजणी

निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि मित्रपक्षांची आघाडी या निवडणुकीत विजयी होऊन सरकार स्थापन करेल. ११ कोटी सदस्यांचा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष, असा ढोल भाजपकडून बडवला जातो. पण विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांना सक्षम उमेदवार मिळत नाहीत. शेवटी काँग्रेस आणि इतर पक्षातून त्यांना मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. यातच भाजपने आपला नैतिक पराभव मान्य केल्यासारखे आहे.

हेही वाचा - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा राज ठाकरेंना कार्टूनमधून चिमटा!

काँग्रेस आघाडीची लढाई भाजप-शिवसेनेसोबतच पक्षांतर केलेल्या मंडळींशी होणार आहे. आयाराम-गयाराम संस्कृतीला जनता दाद देत नाही. त्यामुळे लोकांचा पक्षांतरावरील संताप या निवडणुकीत दिसून येईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Intro:निवडणुकीत महाराष्ट्राच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा व्हावी!: अशोक चव्हाण

mh-mum-01-cong-ashokchvan-7201153

मुंबई, ता. २१ :

आगामी विधानसभा निवडणुकीत शेती, रोजगार, आर्थिक मंदी, ढासळलेली अर्थव्यवस्था अशा जनतेशी निगडित ज्वलंत प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. राज्याच्या ज्वलंत मुद्यांवर भाजप-शिवसेना सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. आपले हे अपयश लपवण्यासाठी कदाचित सरकार भावनिक मुद्दे उपस्थित करून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करेल. पण काँग्रेसचे कार्यकर्ते सरकारला जनतेच्या रोजच्या जीवनातील ज्वलंत प्रश्नांवर उत्तर द्यायला भाग पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि मित्रपक्षांची आघाडी या निवडणुकीत विजयी होऊन सरकार स्थापन करेल. ११ कोटी सदस्यांचा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष, असा ढोल भाजपकडून बडवला जातो. पण विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांना सक्षम उमेदवार मिळत नाहीत. शेवटी काँग्रेस आणि इतर पक्षातून त्यांना मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. यातच भाजपने आपला नैतिक पराभव मान्य केल्यासारखे आहे. काँग्रेस आघाडीची लढाई भाजप-शिवसेनेसोबतच पक्षांतर केलेल्या मंडळींशी होणार आहे. आयाराम-गयाराम संस्कृतीला जनता दाद देत नाही. त्यामुळे लोकांचा पक्षांतरावरील संताप या निवडणुकीत दिसून येईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. Body:
निवडणुकीत महाराष्ट्राच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा व्हावी!: अशोक चव्हाण

mh-mum-01-cong-ashokchvan-7201153

मुंबई, ता. २१ :

आगामी विधानसभा निवडणुकीत शेती, रोजगार, आर्थिक मंदी, ढासळलेली अर्थव्यवस्था अशा जनतेशी निगडित ज्वलंत प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. राज्याच्या ज्वलंत मुद्यांवर भाजप-शिवसेना सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. आपले हे अपयश लपवण्यासाठी कदाचित सरकार भावनिक मुद्दे उपस्थित करून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करेल. पण काँग्रेसचे कार्यकर्ते सरकारला जनतेच्या रोजच्या जीवनातील ज्वलंत प्रश्नांवर उत्तर द्यायला भाग पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि मित्रपक्षांची आघाडी या निवडणुकीत विजयी होऊन सरकार स्थापन करेल. ११ कोटी सदस्यांचा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष, असा ढोल भाजपकडून बडवला जातो. पण विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांना सक्षम उमेदवार मिळत नाहीत. शेवटी काँग्रेस आणि इतर पक्षातून त्यांना मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. यातच भाजपने आपला नैतिक पराभव मान्य केल्यासारखे आहे. काँग्रेस आघाडीची लढाई भाजप-शिवसेनेसोबतच पक्षांतर केलेल्या मंडळींशी होणार आहे. आयाराम-गयाराम संस्कृतीला जनता दाद देत नाही. त्यामुळे लोकांचा पक्षांतरावरील संताप या निवडणुकीत दिसून येईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.