ETV Bharat / state

प्रलंबित मागण्यांसाठी 'आशा' वर्कर्सनी घेतली अमित ठाकरेंची भेट - आशा वर्कर्स प्रलंबित मागण्या

महाराष्ट्रात सुमारे 72 हजार आशा स्वयंसेविका आणि 3500 पेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. राज्यातील साथरोग सर्व्हे, आरोग्य समितीचे कामकाज यासह सुमारे 80 प्रकारची विविध कामे आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक करत असतात. मात्र, यासाठी त्यांना पुरेसे मानधन मिळत नसल्याच्या तक्रारी राज्यभरातील अशा गटप्रवर्तकांच्यावतीने करण्यात येत आहेत. यासाठी अनेकदा त्यांनी आंदोलने केली होती. मात्र, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत. म्हणून आशा वर्कर्सनी आपल्या समस्या ऐकवण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली.

Amit Thackeray
अमित ठाकरे
author img

By

Published : Jun 20, 2020, 5:59 PM IST

मुंबई - आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'आशा' वर्कर गेली पाच वर्षं राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांना शासन गांभीर्याने घेत नाही. म्हणूनच आज 'आशा'वर्करच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.

आशा' वर्कर्सनी मनसे नेते अमित ठाकरेंची भेट घेतली

महाराष्ट्रात सुमारे 72 हजार आशा स्वयंसेविका आणि 3500 पेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. राज्यातील साथरोग सर्वे, आरोग्य समितीचे कामकाज यासह सुमारे 80 प्रकारची विविध कामे आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक करत असतात. मात्र, यासाठी त्यांना पुरेसे मानधन मिळत नसल्याच्या तक्रारी राज्यभरातील अशा गटप्रवर्तकांच्यावतीने करण्यात येत आहेत. यासाठी अनेकदा त्यांनी आंदोलने केली होती. मात्र, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या या 'आशां'नी कोरोना संकटकाळात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावूनही त्यांना अत्यंत तुटपुंजे (१६०० ते २५००) मानधन दिले जाते.

आशा वर्कर्सनी आपल्या समस्या ऐकवण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. आता मनसेच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज येरुणकर, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपविभागाध्यक्ष विनायक राऊत उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अशा गटप्रवर्तक आपल्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे दाद मागत आहेत. शासनाने 2 जुलै पर्यंत मागण्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यास राज्यभरातील आशा सेविका आणि गटप्रवर्तक तीन जुलैपासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.