ETV Bharat / state

' वांद्र्याचे पार्सल वांद्र्याला पाठवा अन् यामिनी जाधवांना विधानसभेत पाठवा' - byculla assembly election 2019

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत हे भायखळ्यात युतीच्या उमेदवारासाठी प्रचार केला.

बोलताना अरविंद सावंत
author img

By

Published : Oct 14, 2019, 2:25 PM IST

Updated : Oct 14, 2019, 3:05 PM IST

मुंबई - भायखळा विधानसभा मतदार संघात आमदारांनी काही केले नसल्याचे समजून आल्याने सर्व धर्मीय यामिनी जाधव यांच्या प्रचारात झाडून उतरले आहेत. यामुळे आता मतदारांनी वांद्र्याचे पार्सल वांद्र्याला पाठवून भायखळ्याचे पार्सल म्हणजेच यामिनी जाधव यांना विधानसभेत पाठवावे, असे आवाहन करत वारीस पठाण यांच्यावर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी टीका केली.

बोलताना मंत्री अरविंद सावंत

भायखळा विधानसभा मतदार संघामधून महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सावंत बोलत होते. यावेळी बोलताना मतदारांनी तिसरा डोळा उघडून सर्व विरोधी उमेदवारांना घरी बसवावे, असे आवाहन सावंत यांनी केले.

मुंबई महापालिका निवडणुकीत यशवंत जाधव व यामिनी जाधव दोघांनी निवडणूक लढवली. त्यात यामिनी जाधव यांचा पराभव झाला. मात्र, यामिनी जाधव या सध्या विधानसभा निवडणूक लढवत आहेत. काल आमच्या सोबत नसलेले मनोज जामसुतकर आमच्या सोबत आहेत. यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे सावंत म्हणाले.

हेही वाचा - विधानसभा निवडणुकीत 9 हजार 673 केंद्रातील मतदानाचे होणार लाइव्ह वेबकास्ट

डॉकयार्डला बाबू गेनू इमारत कोसळली. त्या दुर्घटनेत अनेकांचे जीव गेले. त्यांच्या कुटुंबियांना मदत करा, याला जबाबदार असलेल्यांना सोडू नका, असे म्हणत यामिनी जाधव पालिका सभागृहात ढसाढसा रडल्या होत्या. ही संवेदनशीलता त्यांच्यात आहे. यामुळे संवेदनशील असलेल्या यामिनी जाधव यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन सावंत यांनी यावेळी केले.

हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा : 'नो बेल ओनली जेल', आरोपींना न्यायालयामध्ये हजर करणार

Intro:मुंबई - भायखळा विधानसभा मतदार संघात आमदारांनी काही केले नसल्याचे समजून आल्याने सर्व धर्मीय यामिनी जाधव यांच्या प्रचारात झाडून उतरले आहेत. यामुळे आता मतदारांनी वांद्र्याचे पार्सल (आमदार वारीस पठाण) वांद्र्याला पाठवून भायखळ्याचे पार्सल म्हणजेच यामिनी जाधव यांना विधानसभेत पाठवावे असे आवाहन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी केले आहे. Body:भायखळा विधानसभा मतदार संघामधून शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सावंत बोलत होते. यावेळी बोलताना मतदारांनी तिसरा डोळा उघडून सर्व विरोधी उमेदवारांना घरी बसवावे असे आवाहन सावंत यांनी केले.

मुंबई महापालिका निवडणुकीत यशवंत जाधव व यामिनी जाधव दोघांनी निवडणूक लढवली. त्यात यामिनी जाधव यांचा पराभव झाला. मात्र यामिनी जाधव या सव्वाशेर निघाल्या. त्या विधानसभा निवडणूक लढवत आहेत. काल आमच्या सोबत नसलेले मनोज जामसुतकर आमच्या सोबत आहेत यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे सावंत म्हणाले.

डॉकयार्डला बाबू गेनू इमारत कोसळली. त्या दुर्घटनेत अनेकांचे जीव गेले. त्यांच्या कुटुंबियांना मदत करा, याला जबाबदार असलेल्याना सोडू नका, असे म्हणत यामिनी जाधव पालिका सभागृहात ढसाढसा रडल्या होत्या. ही संवेदनशीलता त्यांच्यात आहे. यामुळे संवेदनशील असलेल्या यामिनी जाधव यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन सावंत यांनी यावेळी केले.

आपला विजय पक्का -
ही निवडणूक एकट्या यामिनी जाधव यांची नसून उपस्थित सर्वांची निवडणूक आहे. भायखळ्याच्या विकास करायचा असेल यामिनी जाधव यांनाच निवडून द्यायचे आवाहन जामसुतकर यांनी केले.
पालिकेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि आमदार म्हणून यामिनी जाधव म्हणून निवडून आल्यास भायखळ्याची विकासकामे अडकून राहणार नाहीत असे जामसुतकर म्हणाले. आपला विजय पक्का झाला असे समजून चला असा विश्वास जामसुतकर यांनी व्यक्त केला. Conclusion:
Last Updated : Oct 14, 2019, 3:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.