मुंबई : कोकणाला भरभरून निसर्ग सौंदर्य मिळेल आहे. हेच निसर्ग सौंदर्य आपल्या पेंटिंगमधून (beauty of Konkan through paintings) जगासमोर मांडण्याचा प्रयत्न कोकणच्या मातीतून आलेला होतकरू कलाकार शैलेश गुरव करत (Shailesh Gurav depicts beauty of Konkan) आहे. आपल्या अफाट कष्टाने आणि जिद्दीने क्षेत्रात त्याने भरारी घेतली असून देश विदेशात त्यांच्या पेंटिंगला मागणी वाढत आहे.
निसर्ग सौंदर्य चित्राच्या माध्यमातून : आपापली संस्कृती वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत जगापर्यंत पोहोचावी, यासाठी अनेक प्रयत्न अनेकजण करताना आपण पाहिले आहेत. कोकणात भरभरून निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते. हे निसर्ग सौंदर्य चित्राच्या माध्यमातून जगासमोर यावे. यासाठी होतकरू तरुण चित्रकार शैलेश गुरव याने देखील अथक परिश्रम केले आहेत. सिंधुदुर्गातील कणकवलीतील लौरे गावात जन्माला आलेल्या शैलेशने कोकणाचे संस्कृती निसर्ग आपल्या गावाच्या मातीची ओळख आता समुद्र पार पोहोचवण्याचे काम केले आहे. अँक्रिलिक पेंटिंगच्या माध्यमातून कोकणची संस्कृती, कोकणचा वास हा परदेशात पोहोचवण्यासाठी शैलेश धडपड करत (artist Shailesh Gurav) आहे.
नोकरी सोडून पूर्णवेळ पेंटिंग : शैलेशचे बालपण हे सिंधुदुर्गात गेले. मात्र शिक्षणासाठी शैलेशला मुंबईत यावे लागले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उपजीविकेसाठी ॲनिमेशन क्षेत्रात त्याने हात आजमावयच ठरवले. त्याचा दोन वर्षाचा कोर्स शैलेश गुरव यांनी केला. या कोर्सच्या जोरावर त्याला चांगल्या कंपनीत नोकरी देखील लागली. मात्र लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या शैलेशला नोकरीत काही मन रमत नव्हते. नोकरीला असतानाही आपल्या पेंटिंगची आवड जोपासण्याचा प्रयत्न शैलेशकडून केला जात होता. मात्र कामाची वेळ आणि आवड याची सांगड घालताना शैलेशची दमछाक होत होती. मात्र अत्यंत साधारण कुटुंबातला तरुण, कमावता मुलगा असल्याने नोकरी सोडणे शैलेशला परवडणार नव्हते. मात्र नोकरी करताना शैलेशमधला चित्रकार त्याला खुणावत होता. त्यामुळे नोकरी सोडून पूर्णवेळ पेंटिंग करण्याचा निर्णय शैलेशने घेतला. मात्र सुरुवातीला शैलेशने घेतलेल्या या निर्णयावर कुटुंबात काहीशी मतमतांतरे (Painter Shailesh Gurav) होती.
शैलेशचा प्रवास : चित्रकला क्षेत्रातला प्रवास शैलेशने सुरू केल्यानंतर शैलेशचे गुरु निलेश निकम यांनी शैलेशला चांगली साथ दिली. त्यांच्या सानिध्यात शैलेशने चित्रकलेचे अनेक पैलू समोर आणण्याचा प्रयत्न केला. पोट्रेट चित्र, त्याचे देखावे त्या देखावांमधले बारकावे समजून घेऊन त्या पेंटिंग रेखाटण्याचा प्रयत्न शैलेशने आपले गुरु निलेश निकम यांच्या सानिध्यात सुरू केला. शैलेश गुरव हा मूळचा कोकणमधील असल्याने कोकणातला निसर्ग नेहमीच त्याला हवाहवासा वाटत होता. तोच निसर्ग, कोकणातला समुद्र, तेथील समुद्रकिनारे कोकणची माती तेथील शेती, कोकणची खाद्यसंस्कृती हे सर्व काही चित्राच्या माध्यमातून शैलेश गुरवणे रेखाटायला सुरुवात (Shailesh Gurav) केली.
चित्रांचे प्रदर्शन : शैलेशने घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले. 2018 पासून त्याला यश मिळायला सुरुवात झाली. 2018 साली पहिल्यांदा शैलेशला 'मुंबई आर्ट फेस्टीव्हलच्या' विशेष पारितोषिकाचा बहुमान मिळाला. त्यानंतर शैलेशने कोकणाचे वैविध्य पैलू चित्राच्या माध्यमातून रेखाटले. हे चित्र एवढे सुरक होते की, 2019 मध्ये पहिल्यांदा वरळीत असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे त्या चित्रांचे प्रदर्शन भरले. या चित्राच्या प्रदर्शनात शैलेशला प्रेक्षकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्या चित्रांची वाहवा सर्वेकडे होऊ लागली एवढेच काय तर, विदेशी पर्यटक देखील शैलेशचे चित्र पाहून त्याची स्तुती करत होते. अनेक विदेशी नागरिकांनी त्याच्या चित्रांची खरेदीही केली असल्याचे शैलेश गुरव स्वतः सांगतात. या महिन्यातही शैलेश गुरव यांच्या चित्राचे प्रदर्शन मुंबईत भरवले गेले होते. या प्रदर्शनाला देखील चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसेंदिवस शैलेश गुरव याला आपल्या पेंटिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहे.
200 हून अधिक पोट्रेट : आपल्या कोकणची संस्कृती, माती हे सर्व काही आपल्या चित्राच्या माध्यमातून शैलेश मांडत आहे. आतापर्यंत 200 हून अधिक पोट्रेट शैलेशने रेखाटले आहेत, त्यांचे प्रदर्शन भरला आहे. अत्यंत कष्ट घेऊन शैलेशने आपला चित्रकार होण्याचा प्रवास केला आहे. त्याला मिळालेल्या पसंतीच्या जोरावर आज त्यांनी आपला स्वतःचा स्टुडिओ विरार येथे उभा केला आहे. चांगल्या कंपनीतली नोकरी सोडून चित्रकार बनण्याचा प्रवास शैलेश गुरवसाठी अत्यंत कठीण होता. मात्र आपल्या स्वतःवर त्याचा विश्वास होता. तसेच आपल्या कोकणची संस्कृती चित्राच्या माध्यमातून जगभर पोहोचवण्याचा ध्यास आपण उचलला आहे. आणि तो ध्यास या चित्राच्या माध्यमातून येणाऱ्या काळातही आपण पूर्ण करू, असा विश्वास ईटीव्ही भारतशी बोलताना शैलेशने व्यक्त केला आहे.