मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील समुद्रात अडकलेल्या बार्ज पी-305 वरील 51 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 36 जण बेपत्ता असल्याची माहिती नौदलाकडून दिली जात आहे. दरम्यान, आज(शुक्रवारी) सकाळपासूनच मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक जे जे रुग्णालयामध्ये पोहोचले होते. कंपनीचा एक कर्मचारी येथे आल्यानंतर पीडित कुटुंबाचे नातेवाईक आणि या कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. त्यासोबतच या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची मागणीदेखील यावेळी करण्यात आली.
नौदलाकडून शोध आणि बचावकार्य सुरूच -
बार्ज पी-305 शोध आणि बचावकार्य सुरूच आहे. भारतीय नौदलाकडून बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांना वाचवले आहे, त्यांना मुंबईत परत आणण्यात आले आहे. आयएनएस कोलकाता आणि कोचीच्या सहाय्याने हे कर्मचारी मुंबई बंदरात सुखरूप परतले. यावेळी ४९ जणांचे मृतदेह देखील आणण्यात आले होते. दरम्यान उर्ववरीत ३८ बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आयएनएस कोची पुन्हा एकदा शोध आणि बचाव कार्यासाठी रवाना झाले आहे.
हेही वाचा - 'बार्ज पी३०५' LIVE Updates : मृतांची संख्या ५१ वर; २३ जणांची ओळख पटली..