ETV Bharat / state

मुंबई शहर जिल्ह्यात अंदाजे 50 टक्के मतदान - मुंबई विधानसभा निवडणूक न्यूज 2019

मुंबई शहर जिल्ह्यात सरासरी 50 टक्के मतदान झाले. मतदारांनी मतदान केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी मतदारांचे आभार मानले.

मुंबई शहर जिल्ह्यात अंदाजे 50 टक्के मतदान
author img

By

Published : Oct 22, 2019, 9:41 AM IST

मुंबई - शहर-जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. या ठिकाणी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुंबई शहर जिल्ह्यात सरासरी 50 टक्के मतदान झाले. मतदारांनी मतदान केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी मतदारांचे आभार मानले.

हेही वाचा - मालवणीत तृतीयपंथी बांधवांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक मतदान प्रक्रिया अत्यंत शांतते पार पडली. कोणत्याही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. मतदाराच्या मतदान यादीबाबत तक्रारी आल्या नाहीत. मतदारांना मतदान चिठ्ठी घरपोच देण्यात आल्या. तसेच मतदान केंद्रावर मदतकक्ष स्थापन करण्यात आले होते. मतदान केंद्रावर मतदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्याचा लाभ मतदारांनी घेतला.

हेही वाचा - एक्झिट पोलमध्ये राज ठाकरेंना धक्का; मतदारांनी पुन्हा नाकारले?

मतदारांना विविध सुविधा -

मतदारांना मतदान केंद्रात विविध प्रकारच्या सोयी-सुविधा देण्यात आल्या होत्या. तसेच दिव्यांगासाठी प्रशासनातर्फे व्हील चेअर देण्यात आल्या होत्या. याचा 200 पेक्षा अधिक गरजू मतदारांनी लाभ घेतला.

तळमजल्यावर मतदान केंद्र -

मतदानासाठी 2 हजार 498 मतदान केंद्र तळमजल्यावर केल्यामुळे ज्येष्ठ नागरीक व इतर मतदारांनी समाधान व्यक्त केले. पावसाचा अंदाज आल्याने तातडीने सर्व यंत्रणांनी सतर्क राहून पाणी साचलेल्या ठिकाणी फुटपाथ तयार करून मतदानासाठी मतदारांना सुविधा उपलब्ध करून दिल्या.

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन बंद पडण्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या. मतदानाच्या दरम्यान वरळीसह सर्व मतदारसंघात 18 बॅलेट युनिट, 18 कंट्रोल युनिट, 100 व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. यावेळी मतदानामध्ये वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योजक, प्रसिध्द व्यक्ती, राजकीय व्यक्ती, सिने कलाकार, खेळाडू यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरूवारी होणार आहे.

Intro:Body:mh_mum_polltoday_8pm_mumbai_7204684

मुंबई शहर जिल्ह्यात अंदाजे 50% टक्के मतदान
         मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यात आज झालेल्या विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 50 टक्के मतदान झाले. या झालेल्या मतदाना बद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी मतदारांचे आभार मानले.
मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेने कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता सुरळीत पार पाडली. मतदाराच्या मतदान यादीबाबत तक्रारी आल्या नाहीत. मतदारांना मतदान चिठ्ठी घर पोच देण्यात आल्या होत्या तसेच मतदान केंद्रावर मदतकक्ष स्थापन करण्यात आले होते. मतदान केंद्रावर मतदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्याचा लाभ मतदारांनी घेतला. मतदान प्रक्रिया सुलभ आणि शांततेत संपन्न झाली.
विविध सुविधा
मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुलभ (Accessible) निवडणूक म्हणून जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार मतदान केंद्रात विविध प्रकारच्या सोयी सुविधा देण्यात आल्या होत्या. तसेच दिव्यांगासाठी प्रशासनातर्फे सिडी चेअर कार उपलब्ध करून देण्यात आली होती याचा सर्वात जास्त वापर 200 पेक्षा अधिक गरजू मतदारांनी लाभ घेतला. त्याबद्दल त्यांनी जाहिर आभार देखील व्यक्त केले.
मतदानासाठी 2498 मतदान केंद्र तळमजल्यावर आणल्यामुळे ज्येष्ठ नागरीक आणि इतर मतदारांनी आभार मानून समाधान व्यक्त केले. तसेच पावसाचा अंदाज आल्याने तातडीने सर्व यंत्रणांनी काल सतर्क राहून पाणी साचलेल्या ठिकाणी फुटपाथ तयार करून मतदानासाठी मतदारांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे त्याचा मतदारांना उपयोग झाला व मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाणे सुलभ झाले.
         EVM व VVPAT बंद होण्याच्या काही मोजक्या घटना झाल्या. मतदानाच्या दरम्यान वरळीसह सर्व मतदारसंघात अठरा बॅलेट युनिट, अठरा कंट्रोल युनिट, शंभर व्हीव्हीपॅट बदलण्यात आले होते. तेथे तातडीने नविन मशीन देण्यात आल्या, त्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले. मतदान प्रक्रियेत कोठेही अडथळा निर्माण झाला नाही. आज झालेल्या मतदानामध्ये वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योजक, प्रसिध्द व्यक्ती, राजकीय व्यक्ती, सिने कलाकार, खेळाडू यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतमोजणी ठिकाण
         जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरूवार, दिनांक 24 ऑक्टोबर, 2019 रोजी पुढील दहा विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणी होणार आहे.
1.         178 धारावी- राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, धारावी बस डेपो जवळ, सायन-बांद्रा लिंक रोड, मुंबई -17
2.         179 सायन कोळीवाडा- न्यू सायन म्युन्सिपल स्कूल, प्लॉट नं. 160/161, स्कीम 6, रोड 24, सायन (पूर्व), मुंबई -22
3.         180 वडाळा- सहकार नगर, महानगरपालिका मराठी शाळा, तळमजला हॉल, सहकार नगर, वडाळा (पश्चिम), मुंबई -31
4.         181 माहीम- डॉ. अंथोनीआ डि सिल्व्हा हायस्कूल, राव बहादूर एस. के. बोळे रोड, दादर (पश्चिम), मुंबई -28
5.         182 वरळी – वेस्टर्न स्पोर्टस् असोसिएशन बिल्डिंग, तळमजला हॉल, वेस्टर्न रेल्वे स्पोर्टस् ग्राउंड, महालक्ष्मी, मुंबई-13
6.         183 शिवडी -ना. म. जोशी मार्ग म्युन्सिपल प्रायमरी मराठी शाळा, 1ला मजला हॉल, ना. म. जोशी मार्ग, करी रोड, (पश्चिम), मुंबई -28
7.         184 भायखळा- रिचर्डसन क्रुडास कंपनी लिमिटेड, एसी हॉल, तळमजला, सर जे. जे. मार्ग, भायखळा मुंबई -08
8.         185 मलबार हिल- ग्रॅन्ड मेडिकल कॉलेज जिमखाना नेताजी सुभाष चंद्र रोड, चर्नी रोड (पश्चिम), मुंबई -04
9.         186 मुंबादेवी- गिल्डर लेन महानगरपालिका शाळा , तळमजला , गिल्डर लेन, मुंबई सेंट्रल स्टेशन समोर, मुंबई -08
10.         187 कुलाबा-एलफिन्स्टन तांत्रिक विद्यालय, 1 ला मजला, महापालिका मार्ग, मेट्रो सिनेमासमोर मुंबई -01Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.