ETV Bharat / state

निवडणुकीच्या फंडासाठी स्थायी समितीत ३ हजार कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी - रवि राजा

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसात लागणार म्हणून मागील आठवड्यापासून मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या पाच बैठका घेण्यात आल्या आहेत. आठवड्यातून कमीत कमी एकदा स्थायी समितीची बैठक घ्यावी, असा पालिकेचा नियम आहे.

रवि राजा
author img

By

Published : Sep 18, 2019, 10:32 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होईल, या भीतीने मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकांमागे बैठक सुरू आहे. गेल्या पाच बैठकांमध्ये तब्बल ३ हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यात बेस्टला अनुदान, सायन रुग्णालय पुणर्बांधणी, शाळा दुरुस्ती, रस्ते, पूल आदींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. दरम्यान सदस्यांना बोलू न देता हे प्रस्ताव मंजुर केले जात आहे. स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर करण्याची बुलेट ट्रेन सुरू आहे. निवडणुकीसाठी लागणारा निधी यामधून जमा केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.

रवि राजा आणि राखी जाधव यांची प्रतिक्रिया

हेही वाचा- लै खास, मी काय म्हातारा झालोय का? पवारांची फटकेबाजी

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसात लागणार म्हणून मागील आठवड्यापासून मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या पाच बैठका घेण्यात आल्या आहेत. आठवड्यातून कमीत कमी एकदा स्थायी समितीची बैठक घ्यावी, असा पालिकेचा नियम आहे. एका पेक्षा जास्त बैठका घेण्याचा अधिकार स्थायी समिती अध्यक्षांना असतो. मागील आठवड्यात १३ सप्टेंबराला आचारसंहिता लागेल या भितीने दोन बैठका लावून प्रस्ताव मंजुर करण्यात आले. त्यानंतर या आठवड्यात सोमवारपासून आज बुधवारपर्यंत तीन अशा एकूण ५ बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये तब्बल ३ हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये बेस्टला ४०० कोटींचे अनुदान देण्याचा, सायन रुग्णालयाच्या पुनर्बांधणीसाठी ६७२ कोटींच्या प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. १२ पुलांच्या पुनर्बांधणीसाठी १३४ कोटी आदी पुलांचा समावेश आहे.

निवडणूक फंडासाठीची तयारी -
दरम्यान, स्थायी समितीमध्ये वेगाने प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. त्याच वेगाने कामे होतात का? असा प्रश्न विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. जे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत त्यांची कामे ऑक्टोबर नंतर सुरू होणार आहेत. इतकी घाई कशाला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सर्व सदस्यांना प्रस्तावावर बोलायला देऊन नंतर प्रस्ताव मंजूर करायला हवा. मात्र सदस्यांना बोलू न देताच हे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. मागील पाच वर्षात काय केले ते लोकांना सांगायला हवे. निवडणूक फंडासाठी हे सर्व चालले आहे, असा आरोप रवी राजा यांनी लावला आहे. तर प्रस्तावांची ही बुलेट ट्रेन आहे. सदस्यांना बोलू न देता प्रस्ताव मंजूर करणे हे मुंबईला शोभनीय नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी म्हटले आहे.

Intro:मुंबई - विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होईल या भीतीने मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकांमागे बैठक सुरु आहेत. गेल्या पाच बैठकांमध्ये तब्बल ३ हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यात बेस्टला अनुदान, सायन रुग्णालय पुणर्बांधणी, शाळा दुरुस्ती, रस्ते, पूल आदीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. दरम्यान सदस्यांना बोलू न देता हे प्रस्ताव मंजुर केले जात असून. स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर करण्याची बुलेट ट्रेन सुरु आहे. प्रस्ताव निवडणुकीसाठी लागणारा निधी यामधून जमा केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. Body:विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता काही दिवसात लागणार म्हणून मागील आठवड्यापासून मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या पाच बैठका घेण्यात आल्या आहेत. आठवड्यातून कमीत कमी एकदा स्थायी समितीची बैठक घ्यावी असा पालिकेचा नियम आहे. एका पेक्षा जास्त बैठका घेण्याचा अधिकार स्थायी समिती अध्यक्षांना असतो. मागील आठवड्यात १३ सप्टेंबराला आचारसंहिता लागेल या भितीने दोन बैठका लावून प्रस्ताव मंजुर करण्यात आले. त्यानंतर या आठवड्यात सोमवारपासून आज बुधवारपर्यंत तीन अशा एकूण ५ बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये तब्बल ३ हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये बेस्टला ४०० कोटींचे अनुदान देण्याचा, सायन रुग्णालयाच्या पुनर्बांधणीसाठी ६७२ कोटींच्या प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. १२ पुलांच्या पुनर्बांधणीसाठी १३४ कोटी आदी पुलांचा समावेश आहे.

निवडणूक फंडासाठीची तयारी -
दरम्यान स्थायी समितीमध्ये वेगाने प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. त्याच वेगाने कामे होतात का असा प्रश्न विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. जे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत त्यांची कामे ऑक्टोबर नंतर सुरु होणार आहेत. इतकी घाई कशाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सर्व सदस्यांना प्रस्तावावर बोलायला देऊन नंतर प्रस्ताव मंजूर करायला हवा. मात्र सदस्यांना बोलू न देताच हे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. यामधून आम्ही काय केले हे सत्ताधारी पक्षाला ङ्ककवून द्यायचे आहे. मग मागील पाच वर्षात काय केले ते लोकांना सांगायला हवे. निवडणूक फंडासाठी हे सर्व चालले आहे असा आरोप रवी राजा यांनी लावला आहे. तर प्रस्तावांची ही बुलेट ट्रेन आहे. सदस्यांना बोलू न देता प्रस्ताव मंजूर करणे हे मुंबईला शोभनीय नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी म्हटले आहे.

बातमीसाठी विरोधी पक्ष नेते रवी राजा व राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जडाव यांची बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.