मुंबई : Apple iPhone १५ Series : अॅपलची आयफोन 15 ही सिरीज आजपासून भारतात लाँच झालीये. अॅपलचं भारतातील एकमेव स्टोर हे मुंबईत आहे. त्यामुळं आयफोन 15 खरेदी करण्यासाठी नागरिकांनी आज पहाटेपासूनच अॅपल स्टोरबाहेर रांगा लावल्या आहेत. यातील काही नागरिक हे परराज्यातूनही हा आयफोन खरेदी करण्यासाठी मुंबईत आले आहेत.
आयफोन 15 सिरीज भारतात उपलब्ध : आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स हे अॅपलचे वजनाने आतापर्यंतचे सर्वात हलके मॉडेल आहे. आयफोन 15 सिरीजचे फोन आजपासून भारतात उपल्बध होणार आहेत. iPhone 15 सिरीजचे फोन हे 128GB, 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज क्षमतांमध्ये उपलब्ध आहेत.
-
#WATCH | Apple's iPhone 15 series to go on sale in India from today. Visuals from the country’s second Apple Store at Delhi's Select Citywalk Mall in Saket. pic.twitter.com/1DvrZTYjsW
— ANI (@ANI) September 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Apple's iPhone 15 series to go on sale in India from today. Visuals from the country’s second Apple Store at Delhi's Select Citywalk Mall in Saket. pic.twitter.com/1DvrZTYjsW
— ANI (@ANI) September 22, 2023#WATCH | Apple's iPhone 15 series to go on sale in India from today. Visuals from the country’s second Apple Store at Delhi's Select Citywalk Mall in Saket. pic.twitter.com/1DvrZTYjsW
— ANI (@ANI) September 22, 2023
iPhone 15 ची वैशिष्ट्ये : अॅपलचा iPhone 15 Pro आणि Pro Max टायटॅनियम डिझाइनसह लॉन्च करण्यात आलाय. यात कस्टमाइज अॅक्शन बटण आणि नेक्स्ट जनरेशन पोर्ट्रेटची सुविधा असेल. आयफोन 15 प्रो आणि प्रो मॅक्स ब्लॅक टायटॅनियम, ब्लू टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम आणि नॅचरल टायटॅनियम अशा चार रंगांमध्ये लॉन्च करण्यात आलाय. यावेळी नवीन iPhone 15 सिरीजमध्ये यूजर्सना चार्जिंगसाठी USB Type-C पोर्टचा सपोर्ट मिळणार आहे. म्हणजेच लाइटनिंग पोर्ट फोनमधून काढून टाकण्यात आलंय. हा पोर्ट आता बहुतेक नवीन Androids मध्ये आढळतो.
आयफोन 15 चा कॅमेरा कसा : iPhone 15 Pro आणि Pro Max च्या कॅमेर्याबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांच्या मागील पॅनलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 48MP मुख्य पोर्ट्रेट कॅमेरा उपलब्ध आहे, जो रात्रीच्या मोडमध्ये उत्कृष्ट फोटो क्लिक करतो. एक नवीन 24MP फोटोनिक कॅमेरा उपलब्ध करुन देण्यात आलाय.तसेच तिसऱ्या कॅमेरामध्ये 5X ऑप्टिकल झूमसह 12MP टेलिफोटो कॅमेरा देण्यात आलाय.
आयफोन 15 च्या किंमती : आयफोन 15 च्या 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 799 डॉलर्स म्हणजेच जवळपास 66 हजार 213 रुपये इतकी आहे. आयफोन 15 प्लस 128 जीबी मॉडेलची किंमत 899 डॉलर म्हणजेच जवळपास 7 हजार 500 रुपये असेल. आयफोन प्रो फोनची किंमत 999 डॉलर्सपासून सुरू होईल. तसेच प्रो मॅक्सची किंमत 1199 डॉलर्सपासून होईल. या दोन्ही किमती 256 जीबी व्हेरियंटच्या आहेत.
सी पोर्ट चार्जर : आयफोन 15 मध्ये युएसबी टाईप सी चार्ज दिला आहे. या माध्यमातून फोन चार्ज करता येणार आहे. युनिवर्सल चार्जर असावा यासाठी युरोपियन युनियनमध्ये एक प्रस्ताव पारीत करण्यात आला होता. त्यानंतर कंपनीला या प्रस्तावापुढे झुकावं लागलं आहे. कंपनीने पहिल्यांदाच सी पोर्ट चार्जर आणला आहे.आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस मध्ये ए16 बायोनिक चिपसेट दिली आहे. तर वायर्ड आणि वायरलेस कनेक्टिविटी पर्याय असेल. या व्यतिरिक्त आयफोन प्रो आणि आयफोन प्रो प्लसमध्ये ए17 बायोनिक प्रोसेसर असेल.
हेही वाचा -