ETV Bharat / state

Discussion of Third Front : काँग्रेसला वगळून भाजप विरोधातील पर्यायाचा शोध घेता येणार नाही - मलिक

author img

By

Published : Feb 22, 2022, 2:58 PM IST

Updated : Feb 22, 2022, 3:17 PM IST

तिसऱ्या आघाडीबाबत कोणतीही चर्चा (Discussion of Third Front) नाही, 2024 च्या लोकसभा निवडणूकी आधी (Before the Lok Sabha elections) भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सक्षम पर्याय (Competent option against BJP) उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सामूहिक नेतृत्वातून हा मोर्चा तयार केला जाणार आहे, पण देशातील मुख्य पक्ष असलेल्या काँग्रेसला वगळून (Apart from the Congress) आघाडी होऊ शकत नाही असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP spokesperson Nawab Malik) यांनी व्यक्त केले आहे.

Nawab Malik
नवाब मलिक

मुंबई: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर भाजप विरोधात तिसरी आघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली होती. लोकसभा निवडणूकी आधी (Before the Lok Sabha elections) भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सक्षम पर्याय (Competent option against BJP) उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सामूहिक नेतृत्वातून हा मोर्चा तयार केला जाणार आहे, पण देशातील मुख्य पक्ष असलेल्या काँग्रेसला वगळून (Apart from the Congress) आघाडी होऊ शकत नाही असे मत मलीकांनी व्यक्त केले आहे. के चंद्रशेखर राव आणि त्याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अशाच भेटी घेतल्या होत्या.

नवाब मलिक

नितीश कुमारांनी आधी भाजपातून बाहेर पडावे
या वर्षी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीबाबत सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र या परिस्थितीला नितीशकुमारांच्या नावांचा विचार केला जाऊ शकत नाही. त्याआधी नितीश कुमार यांना भाजपाच्या युतीतून बाहेर पडावे लागेल असे स्पष्ट मत मलिक यांनी व्यक्त केले आहे. सध्या बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जेडीयू आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे या युतीतून ते बाहेर पडल्याशिवाय नितीशकुमार राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून पाहिले जाऊ शकत नाही.

उत्तर प्रदेश मध्ये सरकार बदलणार
उत्तर प्रदेश मध्ये 1993 साली भाजपाचे सरकार होते. त्या वेळेस मोठ्या प्रमाणात धार्माच्या नावाचे राजकारण झाले. त्यामुळेच 1993 च्या नंतर उत्तर प्रदेशच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून पायउतार केले. मात्र त्यानंतर पंचवीस वर्षाने पुन्हा त्यांना संधी दिली होती. मात्र पुन्हा त्यांच्या राजकारणाला उत्तर प्रदेशातली जनता कंटाळली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेश मधले सरकार बदलेल असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : Sameer Wankhede Bar Permit Case : याचिकाकर्ते प्रतिभावंत आहे म्हणून झुकतं माप नाही; तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार

Last Updated : Feb 22, 2022, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.