ETV Bharat / state

Antilia bomb scare case: अँटिलिया स्फोटकं प्रकरणातील आरोपी सुनील मानेचा दोषमुक्तीचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

Antilia bomb scare case: अँटिलिया स्फोटकं प्रकरण ( Mukesh Ambani Threatened Case ) आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील निलंबित पोलिस अधिकारी सुनील माने यांची याचिका आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली ( Sessions Court rejected acquittal application ) आहे. सुनील मानेला 23 एप्रिलला एनआयएने अटक केली होती.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 11, 2022, 7:20 AM IST

मुंबई : Antilia bomb scare case: उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण ( Mukesh Ambani Threatened Case ) आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील ( Mansukh Hiren Murder Case ) निलंबित पोलिस अधिकारी सुनील माने यांनी मुंबई सत्र न्यायालयात UAPA कलमाखालील आरोप रद्द करा, आरोपपत्रात उल्लेख नसल्याचा दाखला देत, कलम रद्द करण्यात यावी तसेच आरोपातून दोषमुक्ती करण्यासाठी याचिका दाखल केली होती. ही याचिका आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली ( Sessions Court NIA court rejected acquittal application ) आहे.

कांदिवली क्राइम ब्रँचचे पोलिस निरीक्षक : सुनील माने हे मुंबईतील कांदिवली क्राइम ब्रँचचे पोलिस निरीक्षक होते. माने यांची दहशतवाद पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये चौकशी करण्यात आली होती. मनसुख हिरन हत्या प्रकरणात अटक झालेले पोलिस निरीक्षक सुनील माने यांना मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणाची पूर्वकल्पना होती असा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा दावा होता.

ॲंटिलिया स्फोटक प्रकरण : ॲंटिलिया स्फोटक प्रकरण उघडकीस आले त्यावेळी सुनिल माने हे गुन्हे शाखा युनिट ८ मध्ये कार्यरत ( Sunil Mane help sachin waze ) होते. या प्रकरणात त्यांनी वाझेंना मदत केल्याचे समोर येताच त्यांची सशस्त्र विभागात बदली करण्यात आली ( Sunil Mane Mansukh Hiren Murder Case ) होती. काही दिवसांनी त्यांचा गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्यानंतर एनआयएने त्यांना अटक केली. याप्रकणात अटक झालेल्या सर्व चारही पोलिसांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

कोण आहे सुनील माने? : सुनील माने हा मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11 मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. नंतर त्याची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये दोन महिन्यांपूर्वी सुनील मानेची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला. सुनील मानेला 23 एप्रिलला एनआयएने अटक केली. अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणाचीही पूर्ण कल्पना होती, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने केला आहे. तर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचे अनेक पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत.

नेमके काय घडले होते? : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकं सापडली होती. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या.

मुंबईतील उच्चभ्रू परिसर : मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो. स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळलं. पोलिसांच्या माहितीनुसार मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला. मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.