मुंबई - अँटिलिया स्फोटक प्रकरणात आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी एनआयएने दोन जणांना अटक केली आहे. संतोष शेलार आणि आनंद जाधव अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी एका आरोपीला लातूर येथून अटक करण्यात आली आहे. यापैकी या दोघांनाही विशेष न्यायालयात हजर केले असता, पुढील तपास करण्यासाठी एनआयएने 21 जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात त्यांची भूमिका आणि सहभागाबद्दल अधिक माहिती NIA घेत आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....