ETV Bharat / state

Malegaon BombBlast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील ( Malegaon Bomb Blast ) आणखी एक साक्षीदार फितूर झाला आहे. ( Witness Change his Statement Malegaon Bomb Blast ) मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील नियमित सुनावणी होती.

mumbai
मुंबई
author img

By

Published : Feb 28, 2022, 12:50 PM IST

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील ( Malegaon Bomb Blast ) आणखी एक साक्षीदार फितूर झाला आहे. ( Witness Change his Statement Malegaon Bomb Blast ) मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील नियमित सुनावणी होती. हा साक्षीदार आरोपी क्रमांक 6,9,11 शी संबंधित होता. तर आतापर्यंत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 18 साक्षीदार फितूर झाले आहे. पुढील सुनावणी 2 मार्च रोजी होणार आहे.

2008 मध्ये झाला होता बॉम्बस्फोट -

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची ( Malegaon Bomb Blast ) चौकशी एनआयएकडे आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ( Malegaon Bomb Blast ) आतापर्यंत 220 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्यातील 18 साक्षीदारांनी त्यांची साक्ष बदलली आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटार सायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर याही या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

हेही वाचा - Agitation OF Sambhaji Raje : छत्रपती संभाजी राजेंना चर्चेसाठी निमंत्रण; शिष्टमंडळ 'वर्षा'वर दाखल

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे नाव घेण्यासाठी दबाव -

सन 2008 साली मालेगाव शहरात झालेल्या बॉम्बस्फोटात ६ जण ठार आणि 100 जण जखमी झाले होते. याप्रकरणी एनआयए न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी एका साक्षीदाराने उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Cm Yogi Adityanath ) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंद्रेशकुमार यांच्यासह ४ नेत्यांना मालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटात गोवण्यासाठी दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) छळ केला, दबाव आणला होता, अशी धक्कादायक माहिती दिली आहे. तसेच एटीएससमोर आपण जबाब दिलेला नाही, असेही त्याने सांगितले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.