ETV Bharat / state

..तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत - महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत शनिवारी एक बैठक घेतली. यावेळी पुन्हा लॉकडाऊन केले पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

..तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत

author img

By

Published : Aug 16, 2020, 2:03 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना महामारी अद्याप नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन तुर्तास हटवला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन हटवण्याची काहीही घाई नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत शनिवारी एक बैठक घेतली. यावेळी पुन्हा लॉकडाऊन केला पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाची लागण फक्त ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना होत नाही. यामध्ये नागरिकांमध्ये संभ्रम आहे. अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण झाली, याचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना हा कुणालाही होऊ शकतो. सहा महिन्याच्या बाळापासून ते कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कोरोना होऊ शकतो. त्यामुळे अति आत्मविश्वास बाळगून चालणार नाही.

महाराष्ट्रात कोरोनाची पहिलीच लाट आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दुसरी लाट येऊ द्यायची नाही. सध्या ही दुसरी लाट कशी थोपवायची याची आपली तयारीही सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कोरोनाचा सर्वाधिक फटका गरीबांना बसला आहे. जर शाळा सुरू झाल्यावर शाळेत कोरोनाचा संसर्ग फैलावला किंवा कार्यालये उघडल्यानंतर त्यात कोरोनाचा संसर्ग वाढला तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन उघडण्याऐवजी आपण मिशन बिगिन अंतर्गत टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करत आहोत.

राज्यात शनिवारी ३२२ कोरोना बाधितांचा मृत्यू. तर दिवसभरात १२ हजार ६१४ नवीन रुग्णांने निदान झाले आहे. त्याचवेळी काल ६ हजार ८४४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या सहा लाखांच्या जवळ पोहचली आहे. राज्यात सध्या १ लाख ५६ हजार ४०९ रुग्णांवर (अॅक्टिव्ह रुग्ण) प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत.

-

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.