मुंबई - राज्यात यंदा उसाचे विक्रमी पीक झाल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला यंदा ऊस गाळपाचा हंगाम संपला तरी राज्यात सुमारे 80 लाख टन ऊस शेतकऱ्यांच्या शेतात उभा होता कारखाने ऊस घेऊन जात नाहीत. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेतातला ऊस जाळला यानंतर कारखान्यांनी जाळलेला ऊस घेऊन गेल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले अखेरीस राज्य सरकारने कारखाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अद्यापही राज्यातील कारखाने सुरू आहेत.
अतिरिक्त ऊस गाळपाला अनुदान - राज्यात यावर्षी उसाचे उत्पादन अधिक झाले असून गेल्या हंगामाच्या तुलनेत सुमारे 2.25 लाख हेक्टर क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शिल्लक आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंगळवारी (दि. 17 मे) सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली या बैठकीला उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, कृषी मंत्री, सार्वजनिक आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, सहकार राज्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी नंतर गाळप झालेल्या सर्व उसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून 200 रुपये प्रति टन याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.
सरकारच्या तिजोरीवर पडणार शंभर कोटींचा भार - या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर शंभर कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. राज्यात 1 मे, 2022 नंतर हंगाम संपेपर्यंत सुमारे 52 लाख टन उसाचे गाळप अपेक्षित आहे. तर पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर वाहतूक होणाऱ्या उसास प्रति टन पाच रुपये प्रति किलो मीटर वाहतूक अनुदान देण्यात येणार असल्याची माहितीही कृषिमंत्र्यांनी दिली.
मराठवाड्यात पाऊस मोठ्या प्रमाणात शिल्लक -राज्यात यंदाच्या गाळप हंगामात 13.67 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. गेल्यावर्षी 11.42 लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली होते. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा 2.25 लाख हेक्टर क्षेत्र अधिक आहे. राज्यातील 100 सहकारी आणि 99 खासगी, अशा 199 सहकारी साखर कारखान्यांकडून 1 हजार 300.62 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गतवर्षीपेक्षा सुमारे 55 हजार 920 टन प्रतिदिन जास्त गाळप क्षमतेने गाळप होत आहे. मागील वर्षी आजच्याच दिवशी (दि. 17 मे, 2021) 1 हजार 13.31 लाख टन गाळप झाले होते. यंदा बीड, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे.
हेही वाचा - Navi Mumbai APMC Market Rates : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आजचे भाजीपाल्याचे बाजारभाव