मुंबई - कोकणातील गणेशोत्सवासाठी गाड्या सोडण्याबाबतचा वाद अखेर मिटला आहे. आज मध्य रेल्वेने कोकणात गणेशोत्सवासाठी 162 स्पेशल गाड्यांची अधिकृत घोषणा केली आहे. या गाड्यांचे आरक्षण आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड, कुडाळ, रत्नागिरी या मार्गावर या 162 गाड्या चालवण्यात येतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या अटी व नियमांचे पालन प्रवासादरम्यान प्रवाशांना करणे बंधनकारक असणार आहे. या सर्व गाड्या गणोशोत्सव स्पेशल आरक्षित असतील. या गाड्या 13 स्लीपर क्लास, 6 सेकंड सिटिंग क्लास, 1 एसी 2 टायर, 4 एसी 3 टायर कोचचा समावेश असेल.
162 विशेष रेल्वे गाड्या सोडणार -
सीएसएमटी ते सावंतवाडी रोड स्पेशल गाड्या 16 फेऱ्यागाडी क्रमांक 01101 सीएसएमटी येथून 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपासून दररोज रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सुटेल.सावंतवाडी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी पोहचेल.
गाडी क्रमांक 01102 सावंतवाडी रोड ते सीएसएमटी ही गाडी दररोज सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी 16 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान धावेल. तर सीएसएमटी येथे रात्री 21.40 वाजता पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव,खेड, चिपळूण,संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या ठिकाणी थांबे देण्यात आले आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ - लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीच्या 16 फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक 01103 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान दररोज रात्री 23.50 वाजता सुटेल. कुडाळ येथे दुसऱ्या दिवशी 10.30 वाजता पोहचेल.
गाडी क्रमांक 01104 कुडाळ येथून 16 ऑगस्ट पासून ते 23 ऑगस्टपर्यंत दररोज दुपारी 12 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी रात्री 11 वाजता पोहचेल. या गाडी ला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण,संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग या ठिकाणी थांबे देण्यात आले आहे.
सीएसएमटी ते सावंतवाडी रोड स्पेशल गाड्या - फेऱ्यागाडी क्रमांक 01105 सीएसएमटी येथून 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपासून दररोज रात्री 10 वाजता सुटेल. सावंतवाडी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी पोहचेल. गाडी क्रमांक 01106 सावंतवाडी रोड ते सीएसएमटी ही गाडी दररोज सकाळी 8 वाजून 05 मिनिटांनी 16 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान धावेल. तर सीएसएमटी येथे रात्री 20.05 वाजता पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा,खेड, चिपळूण, सावरडा, संगमेश्वर, रत्नागिरी, वीलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या ठिकाणी थांबे देण्यात आले आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी - लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीच्या 16 फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक 01107 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान दररोज रात्री 20.30 वाजता सुटेल. रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता पोहचेल.
गाडी क्रमांक 01108 रत्नागिरी येथून 16 ऑगस्टपासून ते 23 ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी पोहचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण,सावरडा, आरवली रोड, संगमेश्वर या ठिकाणी थांबे देण्यात आले आहे.
सीएसएमटी ते सावंतवाडी रोड स्पेशल गाड्या 24 फेऱ्या - गाडी क्रमांक 01109 सीएसएमटी येथून 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी सुटेल. सावंतवाडी येथे त्याच दिवशी 07 वाजून 15 मिनिटांनी पोहचेल.
गाडी क्रमांक 01110 सावंतवाडी येथून 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान दररोज रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी सुटेल. सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी 6 वाजून 45 मिनिटांनी पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा,खेड, चिपळूण, सावरडा, संगमेश्वर, रत्नागिरी, वीलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या ठिकाणी थांबे देण्यात आले आहे.
गाडी क्रमांक 01111 सीएसएमटी येथून 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. सावंतवाडी येथे त्याच दिवशी 05 वाजून 15 मिनिटांनी पोहचेल. गाडी क्रमांक 01112 सावंतवाडी येथून 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान दररोज संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुटेल. सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी 5 वाजून 50 मिनिटांनी पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या ठिकाणी थांबे देण्यात आले आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते सांवतवाडी - लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीच्या 26 फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक 01113 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. सांवतवाडी येथे त्याच दिवशी दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी पोहचेल.
गाडी क्रमांक 01114 सांवतवाडी येथून 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान दररोज संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 06.15 पोहचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड,वीर, चिपळूण, सावरडा, आरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या ठिकाणी थांबे देण्यात आले आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी - लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीच्या 24 फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक 01115 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी सुटेल. रत्नागिरी येथे त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता पोहचेल.
गाडी क्रमांक 01116 रत्नागिरी येथून 25 ऑगस्ट पासून ते 5 सप्टेंबर पर्यंत दररोज रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजून 15 मिनिटांनी पोहचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड,वीर, चिपळूण, सावरडा, आरवली रोड, संगमेश्वर या ठिकाणी थांबे देण्यात आले आहे.