ETV Bharat / state

विशाखापट्टणम हेरगिरी प्रकरण : मुंबईतून मुख्य सूत्रधाराला अटक - Visakhapatnam espionage case news

विशाखापट्टणम हेरगिरी प्रकरणातील मुख्य आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एनआयएने मोहम्मद हरून हाजी अब्दुल रेहमान लकडवाला (49) या आरोपीस अटक केली आहे.

mumbai
विशाखापट्टणम हेरगिरी प्रकरण
author img

By

Published : May 15, 2020, 8:00 PM IST

मुंबई - विशाखापट्टणम हेरगिरी प्रकरणातील मुख्य आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एनआयएने मोहम्मद हरून हाजी अब्दुल रेहमान लकडवाला (49) या आरोपीस अटक केली आहे. नोव्हेंबर 2019 साली आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे हेरगिरी प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. ज्याचा तपास एनआयएकडून करण्यात येत होता.

काय आहे प्रकरण?
भारतातल्या महत्त्वाच्या ठिकाणाची माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानी हेरांकडून काही एजंट भारतात निर्माण करण्यात आले होते. भारतातील महत्वाच्या लष्करी ठिकाण खास करून नौदलाच्या पाणबुड्यांची संवेदनशील माहिती, त्यांची ठिकाण यासारखी गुप्त माहिती या हेरांकडून मिळविण्याचा प्रयत्न पाकिस्तानातील हेरांकडून करण्यात येत होता. आतापर्यंत झालेल्या तपासानुसार नौदलाचे काहीजण फेसबुक, व्हॉट्सअ‌ॅपच्या माध्यमातून एका पाकिस्तानी नागरिकांच्या संपर्कात होते. ते त्याला गोपनीय माहिती देत होते. या नौदलाच्या काही जणांना गोपनीय माहितीबद्दल पैसाही गुप्त मार्गाने पोहोचवला जात होता.

याप्रकरणी आतापर्यंत 11 नौदलाच्या व्यक्तींसोबत, एका पाकिस्तानी वंशाच्या भारतीय नागरिकत्व असलेला आरोपी शैस्ता कैसर यांना अटक करण्यात आली होती. मुंबईतून पकडण्यात आलेला आरोपी मोहम्मद हरून लकडावाला हा आरोपी पाकिस्तानातील कराचीला बऱ्याच वेळा जाऊन आलेला आहे. कराचीला क्रॉस बॉर्डर ट्रेडच्या नावाखाली हा आरोपी त्याच्या हँडलरला भेटण्यास जात होता. यावेळी तो पाकिस्तानी गुप्तहेर अकबर उर्फ अली, रिजवाण यांना भेटत होता. मोहम्मद हरून लकडावालाच्या माध्यमातून नौदलाच्या 11 आरोपींच्या बँक खात्यात पैसे भरण्यात येत होते. एनआयएने मोहम्मद हरून लकडावाला याला अटक करतेवेळी त्याच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्र व डिजिटल डिव्हाईस जप्त केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.