ETV Bharat / state

Andheri East Bypoll Result : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा आज निकाल येणार हाती

शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latake) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या (Andheri East Bypoll Result Today) जागेवर पोटनिवडणुकीचे मतदान गुरुवारी पार पडले होते. या निवडणुकीची मतमोजणी आज (रविवारी) सकाळी ८ वाजेपासून सुरु (Andheri East Bypoll counting) होणार आहे.

FILE PHOTO
FILE PHOTO
author img

By

Published : Nov 6, 2022, 12:11 AM IST

Updated : Nov 6, 2022, 10:04 AM IST

मुंबई - शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latake) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या (Andheri East Bypoll Result Today) जागेवर पोटनिवडणुकीचे मतदान गुरुवारी पार पडले होते. या निवडणुकीची मतमोजणी आज (रविवारी) सकाळी ८ वाजेपासून सुरु (Andheri East Bypoll counting) होणार आहे. ही मतमोजणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली महानगर पालिकेच्या शाळेमध्ये होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांच्या देखरेखीखाली ही मतमोजणी होणार आहे.

मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचारी तैनात - अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचे मतदान हे ३ नोव्हेंबर २०२२ रोजी घेण्यात आले होते. मतदानानंतर आज (रविवार ६ नोव्हेंबर २०२२) मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी २०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत असणार आहेत. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलाचे ३०० अधिकारी व कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणाही कर्तव्यावर तैनात असणार आहेत. तसेच २० सूक्ष्मस्तरीय निरीक्षक या मतमोजणीस हजेरी लावणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेत सहभाग नोंदविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे.

7 उमेदवार रिंगणात - या मतमोजणी प्रक्रियेला निवडणुकीला उभे असणाऱ्या सात उमेदवारांची अधिकृत व नोंदणी झालेले प्रतिनिधी देखील उपस्थित असतात. या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या प्रत्येक उमेदवाराला आपले प्रतिनिधी म्हणून १५ व्यक्तींना नेमता येते. 'अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात उतरले होते. या सर्वांचा फैसला आज लागणार आहे.

या टप्प्यांमध्ये होईल मतमोजणी - रविवारी सकाळी ८ वाजता टपाली मतपत्रिकांच्या गणनेने मतमोजणीस सुरुवात होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच ८:३० वाज़ता 'ईव्हीएम' यंत्रातील मतांच्या गणनेस सुरुवात होणार आहे. टपाली मतपत्रिकांच्या गणनेसाठी एक मेज असणार असून, 'ईव्हीएम' आधारित मतमोजणीसाठी १४ मेज असणार आहेत.‌ मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीअंती मतगणनेची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे व मतमोजणी केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या 'एलसीडी स्क्रीन' वर देखील दाखविण्यात येणार आहे; अशीही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी यानिमित्ताने दिली आहे.

३१.७४ टक्के झाले होते मतदान - शिवसेनेचे आमदार रमेश लटके ( Shiv Sena MLA Ramesh Latke ) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले. या मतदानाला दिवसभर अत्यंत अल्प प्रतिसाद ( Very short response ) मिळला होता. निवडणूक आयोगाकडून आलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण दिवसभरात फक्त 31.74 टक्के इतके कमी मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी ऐकून 7 उमेदवार रिंगणात होते. यात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके मैदानात आहेत. तर त्यांच्या विरोधात चार अपक्ष व दोन इतर पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. या एकूण सात जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आता आज निकाल लागणार आहे.

आरोप, प्रत्यारोप : मुरजी पटेल यांनी भरलेला उमेदवारी अर्ज त्यांना मागे घ्यावा लागल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड संताप व नाराजी दिसून येत होती. त्याचा परिणाम मतदान प्रक्रियेवर देखील पाहायला मिळाला. पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या समर्थकांकडून मतदारांना नोटाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र, हा प्रकार काही शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला व त्यांनी ही बाब पोलिसांच्या कानावर घातली. त्यामुळे काही काळ या भागात तणावाचे वातावरण होते.

Last Updated : Nov 6, 2022, 10:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.