ETV Bharat / state

अंधेरी पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली, आजचे मतदान ३१.७४ टक्के तर, २०१९ मधले ५३.४५ टक्के

महाराष्ट्र विधानसभेच्या १६६ अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज गुरुवार (दिनांक ३ नोव्हेंबर २०२२)रोजी मतदान झाले. या मतदानाची वेळ सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत होती. या वेळेत सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले आहे. काही तुरळक घटना सोडल्या तर सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी आज दिली आहे.

author img

By

Published : Nov 3, 2022, 9:45 PM IST

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक
अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक

मुंबई - अंधेरी पोट निवडणुकीची जी राज्यभर आणि देशभर चर्चा झाली ती काही थांबण्याचे नाव घेत नव्हती. अखेर आज गुरुवार (दिनांक ३ नोव्हेंबर २०२२)रोजी या निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या दोन पक्षातील नाव आणि चिन्हाची लढाई, भाजपची उमेदवारी माघारी या नाट्यमुळे मुंबई सह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याकडे पाठ फिरवल्याने येथे फक्त एकूण ३१.७४ टक्के मतदान झाले आहे. तर (२०१९) मध्ये ५३.४५ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीची रविवारी (दि. ६ नोव्हेंबर)रोजी मतमोजणी होणार आहे. प्रचंड चर्चा आणि राजकीय तर्क-वितर्कांनी गाजलेल्या या निवडणुकीच्य निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या मतदानात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जरी निश्चित मानला जात असला, तरीही सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर त्यांच्या खालोखाल नोटा या बटनाला सर्वाधिक पसंती भेटणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ANI Twitte
ANI Twitte

मतदानाची टक्केवारी घसरण्याची ५ प्रमुख कारणे- शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व, विधानसभा जागेसाठी आज पोटनिवडणूक पार पडली या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली गेली होती. तर दुसरीकडे या निवडणुकीतून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यानंतर ही निवडणूक एकतर्फी झाली होती. परंतु या दरम्यान काही नाट्यमय घडामोडी अशा घडल्या की, त्या कारणास्तव मतदारांच्या मनात सुद्धा सांशकता निर्माण झाली होती आणि याच कारणासाठी मतदानाची टक्केवारी घसरली. जाणून घेऊया मतदानाची टक्केवारी घसरण्याची पाच प्रमुख कारणे-

१) ऋतुजा लटके या महापालिकेच्या सेवेत होत्या. त्यांनी आपल्या सेवेचा राजीनामा दिला होता. मात्र राजीनामाही वादात सापडला. राजीनामा मंजूर व्हावा यासाठी त्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली होती व न्यायालयीन लढाईनंतर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला होता. हे नाट्य ज्या पद्धतीने झाले ते मतदारांना रुजलेले नाही आहे, या कारणास्तव सुद्धा मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली.

२) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून अधिकृत उमेदवार मुरजी पटेल यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केला होता व या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला होता. परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला. मुरजी पटेल यांनी अचानक माघार घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला. मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजगी बोलूनही दाखवली व या संपूर्ण मतदानावर एक तर्फे बहिष्कारच टाकला.

३) ऐन शेवटच्या क्षणी मुरजी पटेल यांना उमेदवारी देत भाजपने मोठे शक्तिप्रदर्शन केले. परंतु त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्र लिहून या मतदारसंघात भाजपने निवडणूक लढवू नये अशी विनंती केली होती. तसेच विनंती करताना राज्याच्या राजकीय संस्कृतीची आठवण करून दिली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील तशी विनंती केल्याने त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला होता. या सर्व गोष्टी मतदारांच्या नजरेपासून लपून राहिल्या नाहीत. उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा होता व संस्कृतीची आठवणच करून द्यायची होती तर ती अगोदर का झाली नाही? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांसह मतदारांच्या मनात संभ्रम करणारा निर्माण झाला असल्याकारणाने अनेक मतदारांनी सुद्धा या मतदानावर बहिष्कार टाकला.

४) राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे दोन गट झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकर) व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) असे दोन गट झाल्या कारणाने सुद्धा मुळ शिवसेना विभागली गेली आहे. अशातच शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके याच उद्धव ठाकरे गटाकडून ही पोटनिवडणूक लढवत असल्याने शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना या गटाच्या समर्थकांनी सुद्धा भाजप कार्यकर्त्यांसह या निवडणुकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे. ऋतुजा लटके या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने यंदा धनुष्यबाण हे चिन्ह मतदान चिन्हाच्या यादीतून बाहेर पडले आहे. या कारणामुळे सुद्धा अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली.

५) या निवडणुकीत, नोटाचा वापर करण्यासाठी मतदारांना पैसे देऊ केले जात असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी केला होता. या प्रकरणावरून सुद्धा आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या गेल्या. एकंदरीत ज्या पद्धतीने हा निवडणूक प्रचार चर्चेत राहिला, त्या अनुषंगाने मतदार पण या सर्व प्रकाराला कंटाळले होते. या कारणास्तव सुद्धा अनेकांनी मतदानापासून दूर राहणे पसंत केले.

दिवसभरात अशी राहिली मतदानाची टक्केवारी? आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. परंतु अतिशय संथ गतीने मतदान सुरू झाले. वास्तविक पाहता सकाळच्या प्रहरी मोठ्या प्रमाणात सीनियर सिटीजन तसेच बाहेर जाणारी कामकाजी माणसे मोठ्या प्रमाणात मतदान करतात. पण तसे चित्र आज दिसलं नाही. आज मतदानाची दिवसभराची टक्केवारी खालील प्रमाणे राहिली.

सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के

दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के

३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के

५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के

६ वाजेपर्यंत एकूण ३१.७४ टक्के मतदान झाले.

यापूर्वी झालेले मतदान? - २०१४ साली शिवसेना भाजप युती तुटल्यामुळे या जागेसाठी शिवसेना भाजप अशी लढत झाली होती. २०१४ साली झालेल्या लढतीत शिवसेना आमदार रमेश लटके यांनी ५२ हजार ८१७ मत मिळवीत विजय प्राप्त केला होता. तर भाजपचा केवळ ४ हजार ४७९ मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी सुनील यादव या भाजप उमेदवाराला ४८ हजार ३३८ इतकी मत मिळाली होती. मात्र त्यानंतर ही जागा युतीत शिवसेनेकडे होती.

१ लाख ५३ हजार २२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला - २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांना ६२, ६१५ इतकी मत मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष आमदार मुरजी पटेल यांनी ४५ हजार ८०८ इतकी मत मिळविली होती. या मतदारसंघात एकूण २ लाख ८६ हजार २८२ इतके मतदार असून २०१९साली झालेल्या निवडणुकांत ५३.४५ टक्के म्हणजेच १ लाख ५३ हजार २२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.