ETV Bharat / state

Mumbai City Bank Scam : आनंद अडसुळांच्या अडचणी वाढल्या; अटकपूर्व जामीन अर्ज घेतला मागे

author img

By

Published : Feb 1, 2022, 6:22 PM IST

सिटी सहकारी बँक गैरव्यवहार ( Mumbai City Bank Scam ) प्रकरणात शिवसेनेचे नेते आनंद अडसूळ ( Shivsena Leader Anand Adsul ) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका आज मुंबई सत्र न्यायालयाने आज निकाली काढली आहे.

mumbai
mumbai

मुंबई - सिटी सहकारी बँक गैरव्यवहार ( Mumbai City Bank Scam ) प्रकरणात शिवसेनेचे नेते आनंद अडसूळ ( Shivsena Leader Anand Adsul ) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका आज मुंबई सत्र न्यायालयाने आज निकाली काढली आहे. आनंद अडसूळ त्यांच्या वकीलांकडून केस पुढे चालवायची नसल्याचे अर्ज आज न्यायालयात दिले असल्याने न्यायालयाने अटकपूर्व जामीनाची अर्ज निकाली काढला आहे. ईडीने आनंद अडसूळ यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

अडसुळांच्या अडचणीत वाढ -

या अगोदरही आनंद अडसूळ यांनी ईडीची कारवाई टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी उच्च न्यायालयाने त्यांना कोणतीही सवलत न देता मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याचे सांगितले होते. त्यानुसार अडसूळ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर आज कोर्टाने निर्णय देत तात्पुरता जामीन अर्ज फेटाळून लावला होता. आता अडसुळांच्या वकिलांकडून मुंबई सत्र न्यायालयात सुरू असलेल्या अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्याने आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत वाढ झाली असून ईडीकडून केव्हाही अटक होऊ शकते.

प्रकरण काय आहे -

आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. सिटी को-ऑप. बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी केली होती. या तक्रारीनंतर अंमलबजावणी संचालनालयाकडून अडसूळ यांच्या रहात्या घरी आणि कार्यालय येथे धाडी टाकण्यात आल्या होत्या. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

हेही वाचा - Union Budget 2022 : अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडणार नाही : अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.