ETV Bharat / state

"पहचान कौन? म्हणत शायरीद्वारे अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

राज्यात अपुऱ्या लसीवरून राजकारण रंगलेले असताना अमृता फडणवीस यांनी शायरीद्वारे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री कसे घरात बसून राज्य चालवतात. काही दिवसांपूर्वी परमबीर सिंग यांनी जे वसूलीचे आरोप केले त्याचा देखील उल्लेख त्यांनी शायरीमध्ये केला आहे.

अमृता फडणवीस
अमृता फडणवीस
author img

By

Published : Apr 9, 2021, 11:17 AM IST

Updated : Apr 9, 2021, 3:52 PM IST

मुंबई - राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत आहेत. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. यावरुन राज्य सरकार आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलेले पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला केंद्र कमी लस देत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. राज्याच्या राजकारणात जे काही चालू आहे त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मौन बाळगून असल्याचे भाजपचे सर्वच नेते बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील शायरीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी, मुख्यमंत्री कसे घरात बसून राज्य चालवतात. काही दिवसांपूर्वी परमबीर सिंग यांनी जे वसूलीचे आरोप केले त्याचा देखील उल्लेख त्यांनी शायरीमध्ये केला आहे.

"पहचान कौन?
एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही,
अवाम से कभी मिलता नही
सत्य और कर्म की राह पर चलता नही
वसूली के बिन उसका पत्ता हिलता नही
महामारी का कहर उससे सम्हलता नही
प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही!
सच है, धोखा कभी फलता नही।
क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?

अशी शायरी अमृता फडणवीस यांनी ट्वीट केली आहे. व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाही, रेमडेसिवीर उपलब्ध नाही, ऑक्सिजन उपलब्ध नाही, साधे बेड उपलब्ध नाही! मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही. लस येत आहेत. पण, प्राथमिक सेवाही देता येत नसताना भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. याकडे मुख्यमंत्री आणि मंत्री लक्ष देणार का? असा सवाल अमृता फडणवीस यांनी केला आहे.

Last Updated : Apr 9, 2021, 3:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.