मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यातील वाकयुद्ध थांबताना दिसत नाही. अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 'वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहण ही चूक आहे,' असा घणाघात अमृता फडणवीस यांनी केला आहे.
-
Having a bad leader was not Maharashtra’s Fault - But Staying with one is ! जागो महाराष्ट्र ! https://t.co/uc9gmvVrNo
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Having a bad leader was not Maharashtra’s Fault - But Staying with one is ! जागो महाराष्ट्र ! https://t.co/uc9gmvVrNo
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 28, 2019Having a bad leader was not Maharashtra’s Fault - But Staying with one is ! जागो महाराष्ट्र ! https://t.co/uc9gmvVrNo
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 28, 2019
दरम्यान, अॅक्सीस बँकेतील महाराष्ट्र पोलिसांची सॅलरी अकाऊंट्स राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवण्यात येणार असल्याची माहिती आहे. या मुद्द्यावरूनच अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अमृता फडणवीस अॅक्सिस बँकेत वेस्टर्न इंडियाच्या कॉर्पोरेट हेड म्हणून काम करायच्या. 2014 साली पती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच आदेशानं पोलिसांची खाती राष्ट्रीयकृत बँकेतून अॅक्सिसमध्ये वळवल्याचा आरोप होता. नागपूरस्थित सामाजिक कार्यकर्ता मोहनिश जबलपुरे यांनी या प्रकरणी ऑगस्टमध्येच ईडीकडे तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये फडणवीसांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन अॅक्सिस बँकेत पोलिसांची पगार खाती वळवल्याचा आरोप केला आहे.