ETV Bharat / state

MLA Rajan Salvi : उमेदवारी मागे घेणे हे भाजपचे फक्त नाटक; आमदार राजन साळवी यांचा आरोप - Withdrawal of candidature is just play by BJP

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा ( Andheri East Assembly ByElection ) निकाल आज जाहीर होत आहे. भाजपने या जागेवरून उमेदवारी मागे घेतल्याने ही लढत जवळपास एकतर्फी होत आहे.

MLA Rajan Salvi
आमदार राजन साळवी
author img

By

Published : Nov 6, 2022, 3:45 PM IST

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा ( Andheri East Assembly ByElection ) निकाल आज जाहीर होत आहे. भाजपने या जागेवरून उमेदवारी मागे घेतल्याने ही लढत जवळपास एकतर्फी होत आहे. ही पोटनिवडणूक उद्धव ठाकरे गट ( Uddhav Thackeray group ) सहज जिंकेल हे आता स्पष्ट झाले आहे. या जागेवर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार रुतुजा यांच्याशिवाय अन्य सहा उमेदवार रिंगणात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ही पहिलीच निवडणुक होत आहे. हा विजय उद्धव गोटासाठी सोपा असला तरी रमेश लटके यांच्या निधनामुळे एक भावनिक वलय या निवडणुकीत आहे. मतमोजणी अद्याप सुरू असले तरी ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

भाजपने खंजीर खुपसला : या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) गटाचे आमदार राजन साळवी यांनी ऋतुजा लटके यांच्या अंधेरी येथील कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार राजन चावी म्हणाले की, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा विजय हा अंधेरीकरांनी महाविकास आघाडीवर दाखवलेला विश्वास आहे. मी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्रात पुढील काळात होऊ घातलेल्या सर्व निवडणुकांसाठी हा विजय महाविकास आघाडीसाठी एक शुभ शकुन आहे. त्यामुळे आजपासून या शुभ शकुनला सुरुवात झाली असे मी मानतो. या निवडणुकीत भाजपाने फक्त उमेदवार मागे घेण्याचे नाटक केले. मात्र, अर्ज मागे घेऊनही ते शांत बसले नाहीत. भाजपाने पाठित खंजीर खुपसला. असा गंभीर आरोप आमदार राजन साळवी यांनी केला आहे.

ऋतुजा लटके यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा : या मतदारसंघात १ लाख ५ हजार मराठी, ५७ हजार उत्तर भारतीय, ३३ हजार मुस्लिम, १९ हजार ख्रिश्चन व इतर गुजराती धार्मिक मतदार आहेत. मुंबई महानगरपालिकेचे ८ प्रभाग या विभागांमध्ये असून त्यातील ५ ठिकाणी शिवसेनेचा, २ ठिकाणी भाजप व १ ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. संमिश्र असा हा विधानसभा मतदारसंघ असला तरी महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसची २७ हजार ९५१ मतं जी मागच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराला भेटली होती. ती आपल्याकडे खेचण्याचा त्याचबरोबर ती मते ऋतुजा लटके यांना मिळण्यासाठी या विभागात ३ टर्म आमदार असलेले व माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी हे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.