ETV Bharat / state

थोडक्यात महत्त्वाचे : महाराष्ट्रातील घडामोडी

राज्यातील संपूर्ण महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात...

author img

By

Published : Jul 24, 2020, 1:46 PM IST

Updated : Jul 24, 2020, 5:08 PM IST

maharashtra news
थोडक्यात महत्त्वाचे : महाराष्ट्रातील घडामोडी

राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात...

  • मुंबई - पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (शुक्रवारी) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बीकेसीतील कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी एमएमआरडीएच्या सर्व प्रकल्पाचा आढावा घेतला. मंत्रीपदाचा भार स्विकारल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आज पहिल्यादाच एमएमआरडीए कार्यालयाला भेट दिली. मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एमएमआरडीएकडून मेट्रोसह अनेक महत्वाचे प्रकल्प राबवले जात आहेत. तेव्हा या सर्व प्रकल्पाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. तसेच मेट्रो, शिवडी-नाव्हा-शेवा सागरी महामार्ग (एमटीएचएल) आणि इंटिग्रेटेड तिकीटिंग सिस्टीम या मुख्य प्रकल्पाचा त्यांनी आढावा घेतला.
  • कराड (सातारा) - कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या संपर्कातील नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ५० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच नगरपालिका इमारत सॅनिटाईज करुन सील करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत कामकाज बंद राहणार आहे. दरम्यान, नगराध्यक्षांच्या पतीसह कुटुंबातील ९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर नगरपालिकेतील निकट सहवासितांचे स्वॅब आज (शुक्रवारी) तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत.
  • नंदुरबार - एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन होत असताना दुसरीकडे दररोज येणार्‍या अहवालात कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी पुन्हा 12 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यात शहादा तालुक्यातील वैजाली गावात आणि नवापूर तालुक्यातील गडद येथे कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. तर 7 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 428 वर पोहोचली आहे.
  • बुलडाणा - जिल्ह्यात गुरुवारी 39 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 40 जणांनी कोरोनावर मात केली. यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविलेल्या आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 259 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 220 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 38 आणि रॅपिड टेस्टमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 201 तर रॅपिड टेस्टमधील 19 अहवालांचा समावेश आहे. एकूण 220 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
  • नागपूर - गुरुवारी शहरात 172 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यामुळे येथील एकूण बाधितांची संख्या 3 हजार 465 वर पोहोचली आहे. गुरुवारी पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रशासनाने आधीच इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन केले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळले. यानंतर या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यासोबतच गुरुवारी 100 जणांनी कोरोनावर मात केली. नागपुरात एकूण बरे झालेल्यांची संख्या 2 हजार 213 वर पोहोचली आहे.
  • वाशिम - गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 4 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. तर 12 जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 438 वर पोहोचली आहे. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 182 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
  • औरंगाबाद - जिल्ह्यातील 74 रुग्णांचे अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 12 हजार 421 वर पोहोचली आहे. त्यापैकी 7 हजार 178 जण बरे झाले आहेत. तर एकूण 426 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 4 हजार 817 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
  • राजूरा (चंद्रपूर) - येथील एका शेतकरी पुत्राने एकाच वेळी तीन परिेक्षेत उत्तीर्ण होत यशाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तिन्ही पदावरती निवड झाली आहे. सुरेंद्र मनोहर बुटले असे शेतकरी पुत्राचे नाव आहे. ते गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील रहिवासी आहे. पदवी घेत असताना ग्रामीण भागात राहूनच स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली. पुढे २०१५ पासून सुरेंद्र यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुण्यामधील प्रज्ञावर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्रामधून राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचा अभ्यास सुरू केला. अनेकवेळा अपयशाला सामोरे जाऊनही खचून न जाता जिद्द आणि चिकाटीने अधिक जोमाने अथक परिश्रम घेतले आणि एकाच आठवड्यात लोकसेवा आयोगाच्या तिन्ही परिक्षा उत्तीर्ण होऊन दाखविले.
  • रायगड - जिल्ह्यामध्ये हजारो कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पेण तालुक्यातही बाधितांची संख्या सुमारे 800 च्या वर पोहोचली आहे. कोरोनाच्या तपासणीकरिता पेण उपजिल्हा रुग्णालयात रोज शेकडो संशयित रुग्ण येत असतात. मात्र, ही वाढती संख्या लक्षात घेता पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या फार कमी पडत आहे. त्यामुळे या रुग्णालयात काम करण्याकरिता स्थानिक प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत. मात्र, अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवून उपजिल्हा रुग्णालयात हजेरी लावलीच नाही. त्यामुळे येथील रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नाही. पेण येथील सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मेलद्वारे या प्रकरणाची तक्रार केली आहे.
  • अकोला - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे भाजयुमोतर्फे सकाळपासून खासदार पवार यांना 'जय श्रीराम' असे लिहलेले पाच हजार पत्रे पाठविण्याची मोहीम येथील मोठ्या डाक कार्यालयातून राबविण्यात आली. कोविड 19 च्या काळात श्रीराम मंदिर बांधणे योग्य आहे का, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. यामुळे भाजपतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी भाजपचे आमदार, महापौर अर्चना मसणे आणि शहराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यासह भाजयुमोचे शहराध्यक्ष उमेश गुजर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Last Updated : Jul 24, 2020, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.