ETV Bharat / state

Ajit Pawar On Sanjay Raut: आमच्या पक्षाचे वकीलपत्र घेऊ नका; अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले - राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार नाराज असून पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यासोबत चाळीस आमदार असल्याच्या चर्चांना गेल्या दोन दिवसांपासून उधान आले होते. यासंदर्भात काही पक्षांचे प्रवक्ते मत व्यक्त करीत होते. याबाबत उद्विग्न झालेल्या अजित पवारांनी 'आमचे वकीलपत्र घेऊ नका', म्हणत शिवसेनेचे (उबाठा) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना थेट फटकारले आहे.

Ajit Pawar On Sanjay Raut
अजित पवार विरुद्ध संजय राऊत
author img

By

Published : Apr 18, 2023, 4:16 PM IST

Updated : Apr 18, 2023, 5:35 PM IST

अजित पवार संजय राऊतांविषयी बोलताना

मुंबई: विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांबाबत आज (मंगळवारी) मौन सोडले आणि थेट विरोधकांसह महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांवरही प्रहार केले. अजित पवार 40 आमदारांच्या सह्या घेऊन भाजपच्या संपर्कात असल्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत; मात्र यात तथ्य नसल्याचे सांगत या संदर्भात ज्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी आपली मते व्यक्त केली, ती कशाच्या आधारावर असा प्रश्न अजित पवारांनी पत्रकार परिषदेत केला.

'हे' आमदार आपल्या संपर्कात? केवळ 40 आमदार संपर्कात नसून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वच आमदार आपल्या संपर्कात आहेत. धनंजय मुंडे, अनिल पाटील, शेखर निकम, देवेंद्र भुयार, धर्मरव अत्राम, नितीन पवार, आनंद परांजपे, अण्णा बनसोडे, माणिकराव कोकाटे हे सर्व आमदार आपल्या कामानिमित्त नेहमी संपर्कात असतात. ते आजही संपर्कात आहेत आणि उद्याही असतील; मात्र याचा अर्थ आम्ही पक्ष सोडून बाहेर जातो असा होत नाही, असे पवार यांनी यावेळी ठणकावले.

आमचे कुणी वकीलपत्र घेऊ नये: यावेळी बोलताना अजित पवारांनी नाव न घेता शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना चांगलेच फटकारले. कुणीही आमचे वकीलपत्र घेऊन आमच्या वतीने बोलू नये. आमची आणि आमच्या पक्षाची बाजू मांडायला आम्ही समर्थ आहोत. तुम्हाला जे काही म्हणायचे असेल ते तुमच्या पक्षाबद्दल सांगा, तुमच्या मुखपत्रात लिहा असे थेट अजित पवार यांनी ठणकावले. अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामधील राजकीय संबंधावर प्रकाश पडला आहे. तसेच संजय शिरसाट आणि अन्य पक्षाच्या प्रवक्तांनीही आपापल्या पक्षाची भूमिका मांडावी. आमच्याबद्दल बोलू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अजित पवारांच्या नाराजीला हवा: विरोधी पक्ष नेते अजित पवार हे सातत्याने पक्षात नाराज असल्याची चर्चा होते आहे. आपल्याला उपमुख्यमंत्री पद मिळाले यासाठी अजित पवारांनी 36 आमदारांसह दहा वर्षांपूर्वी पक्षामध्ये बंड केले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संधान बांधून उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली होती. आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या या पक्षांतर्गत नाराजीचा फायदा घेऊन भाजप हा राष्ट्रवादी पक्षामध्ये संभ्रम निर्माण करीत आहे आणि आपली सत्ता टिकवण्यासाठी नवीन शक्कल लढवीत आहे, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: Sharad Pawar News: स्पष्ट सांगितल्यानंतर फाटे फोडण्याचे अधिकार तुम्हाला नाही-शरद पवार

Last Updated : Apr 18, 2023, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.