ETV Bharat / state

'हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण अत्यंत संतापजनक अन् लाजिरवाणी बाब' - अजित पवार हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण

हाथरसची घटना ही या देशातील शेवटची घटना ठरावी, यासाठी शासन, न्यायालय आणि समाज सर्वजण मिळून प्रयत्न करतील. सर्वजण आपआपल्या परीने जबाबदारी पार पाडतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

अजित पवार
अजित पवार
author img

By

Published : Sep 30, 2020, 12:42 PM IST

मुंबई - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाथरस येथील पीडित तरुणीला श्रद्धांजली वाहिली. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आणि पीडित तरुणीचा आज मृत्यू झाल्याची घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. असे कृत्य करणारे नराधम समाजात आहेत, हे सहन होण्यापलीकडे आहे. असे अमानुष कृत्य करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यापेक्षाही जबर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.

  • उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आणि पीडित तरुणीचा आज मृत्यू झाल्याची घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक व लाजिरवाणी आहे. असं अमानूष कृत्य करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यापेक्षाही कठोर शिक्षा झाली पाहिजे. भावपूर्ण श्रद्धांजली!#JusticeForManishaValmiki

    — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पीडितेला न्याय मिळावा यासाठी, सबंधित सरकारने न्यायालयीन प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन आरोपींना त्यांच्या पापाचे फळ लवकरात लवकर द्यावे. न्यायालयाच्या माध्यमातून आरोपींना कठोर शिक्षा देत असतानाच स्त्रीशक्तीचा आदर करणाऱ्या सभ्य समाजनिर्मितीची जबाबदारीही आपल्या सर्वांची आहे. महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन सकारात्मक होईल, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे, असेही अजित पवार म्हणाले.

हाथरसची घटना ही या देशातील शेवटची घटना ठरावी यासाठी शासन, न्यायालय आणि समाज सर्वजण मिळून प्रयत्न करतील. सर्वजण आपआपल्या परीने जबाबदारी पार पाडतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ट्विट करून उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर निशाणा साधला. जिवंतपणी सुद्धा मुलींना सन्मान दिला जात नाही आणि तिच्या मृत्यूनंतर सुद्धा तिची अवहेलना केली जात आहे, अशी टीका केली आहे. भारताच्या मुलीचा अंत्यसंस्कार रात्रीच्या अंधारात करणे, उत्तर प्रदेश सरकारची ही कृती अमानवी आणि अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.