ETV Bharat / state

'म्यूकर मायकोसिस'वरील औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी, अजित पवारांची माहिती

म्यूकर मायकोसिस आजाराने सध्या तोंड वर काढले आहे. त्यामुळे म्यूकर मायकोसिसवरील औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले.

मुंबई
mumbai
author img

By

Published : May 17, 2021, 10:47 PM IST

मुंबई - राज्यातील कोरोना परिस्थितीसह कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी म्यूकर मायकोसिस आजार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात आला. म्यूकर मायकोसिसवरील औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्धा करून देण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले. तसेच, लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासह ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचे उपमुख्यमंत्र्यांकडून निर्देश देण्यात आले.

अजित पवारांचे आदेश -

'राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने उपाययोजनांसाठी तातडीने पावले उचलावीत. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी आणि उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी. यामध्ये लहान मुलांचे व्हेंटिलेटर तसेच त्यांच्यासाठी लागणारी औषधे, इतर उपचारांसाठीची सामुग्री उपलब्ध करावी. तिसरी लाट येण्यापूर्वी ही व्यवस्था यथाशिघ्र उभारावी', असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

'प्रत्येक जिल्ह्यात उभारणार ऑक्सिजन प्लांट'

'राज्यासाठी २५ हजार मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढण्यात येत आहे. ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या ‘पीएसए’ प्लांटची निर्मिती प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहे. राज्यात ३६ जिल्ह्यामध्ये ३०१ प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यापैकी ३८ प्लांट कार्यरत आहेत. या ३८ प्लांटमधून ५१ मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयात व जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘पीएसए’ प्लांट उभारण्यात येत आहेत. २४० प्लांट उभारण्यासाठीची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. त्याची प्रक्रिया सुरु आहे. येत्या काही काळात सर्व प्लांटद्वारेच राज्यात एकूण सुमारे ४०० मेट्रीक टन प्रतिदिन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. या ऑक्सिजनद्वारे १९ हजारापेक्षा अधिक ऑक्सिजन बेडची गरज पूर्ण होईल', असेही अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटीचे रक्तचंदन पोलिसांनी पकडले, आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.