ETV Bharat / state

Ajit Pawar News : पक्ष मजबूत करण्यासाठी अजित पवार गटाचा 'धडाका' ; पक्षातील मंत्र्यांवर आहे 'या' जिल्ह्यांची जबाबदारी - Ajit Pawar group

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी भाजपा आणि शिंदे सरकारसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर आता त्यांचे पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्षातील विविध मंत्र्यांवर पक्ष संघटना वाढीसाठी जिल्हानिहाय जबाबदारी सोपविली आहे.

Ajit Pawar News
सुनिल तटकरे
author img

By

Published : Aug 19, 2023, 10:30 AM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडाळी करुन अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत शिंदे फडणवीस सरकारला साथ दिली. स्वतः अजित पवार उपमुख्यमंत्री पदी तर इतर सहकारी वेगवेगळ्या मंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर अजित पवार गटानं राष्ट्रवादी पक्ष आपलाच असल्याचा दावा केला. मात्र गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेला मिळणारा प्रतिसाद पाहून अजित पवार गट धास्तावल्याचं बोललंं जात आहे. त्याचं अनुषंगानं अजित पवार गटानं पक्ष संघटना वाढीसाठी पावले उचलले आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्षातील मंत्र्यांवर जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत.

मंत्र्यांना दिल्या 36 जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी याबाबत पत्रक जाहीर केलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करणं गरजेचं आहे. त्यासाठी पक्षाच्या वतीनं महत्वपूर्ण बैठका उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाल्या होत्या. बैठकीनुसार पक्षाच्या वाढीसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि 9 मंत्री यांच्यावर 36 जिल्ह्यांची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सोपवली असल्याचं पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

Ajit Pawar News
सुनील तटकरे यांनी जाहिर केले प्रसिद्धीपत्रक

कोणाकडे 'कोणत्या' जिल्ह्याची जबाबदारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुणे, सातारा, सांगली व सोलापूर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, व नागपूर, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर, दिलीप वळसे पाटील यांच्यावर अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलडाणा, हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर, सिंधुदूर्ग, व अहमदनगर, धनंजय मुंडे यांच्यावर बीड, परभणी, नांदेड, व जालना, संजय बनसोडे यांच्यावर हिंगोली,लातूर, व उस्मानाबाद, अदिती तटकरे यांच्यावर रायगड, रत्नागिरी, ठाणे, व पालघर, अनिल पाटील यांच्यावर जळगाव, धुळे, व नंदुरबार, धर्मारावबाबा आत्राम यांच्यावर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्हयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. Nitin Gadkari : नितीन गडकरींना बाजूला करण्याचा मोदींचा प्रयत्न, दिली होती 'ही' ऑफर
  2. Amethi Lok Sabha Constituency : अमेठी मतदारसंघ होता गांधी घराण्याचा बालेकिल्ला, जाणून घ्या इतिहास
  3. MU Senate Election : सिनेट निवडणुकीवरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.