ETV Bharat / state

एआयसीटीईचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर; 15 सप्टेंबरपासून होणार वर्ग सुरू

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्यावतीने (एआयसीटीई) देशभरात चालविण्यात येणाऱ्या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून देशातील एआयसीटीच्या अंतर्गत चालणारी सर्व व्यावसायिक महाविद्यालये आणि त्यातील नवीन वर्ग हे 15 सप्टेंबर 2020 पासून सुरू होणार आहेत.

author img

By

Published : Jul 5, 2020, 12:47 AM IST

AICTE issues revised academic calendar for 2020-21
एआयसीटीईचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर; 15 सप्टेंबरपासून होणार वर्ग सुरू

मुंबई - देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. असे असताना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्यावतीने (एआयसीटीई) देशभरात चालविण्यात येणाऱ्या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार देशातील एआयसीटीच्या अंतर्गत चालणारी सर्व व्यावसायिक महाविद्यालये आणि त्यातील नवीन वर्ग हे 15 सप्टेंबर 2020 पासून सुरू होणार आहेत.

एआयसीटीईच्या अंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या शैक्षणिक वर्षांची सुरूवात, यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र शुक्रवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सामाईक प्रवेश परीक्षाच्या तारखा जाहीर केल्या. त्यामुळे यात बदल करण्यात आला आहे. आता याची सुरूवात 15 सप्टेंबरपासून होणार आहे.

देशात एआयसीटीईच्या अंतर्गत अभियात्रिकी, व्यवस्थापन, वास्तुकला, औषध निर्माणसह अन्य अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तर राज्यात अभियांत्रिकी, फार्मसी आदी व्यवसायिक अभ्यासक्रम हे उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत चालतात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी केव्हा होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सीईटीच झाल्या नसल्याने, एआयसीटीईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शैक्षणिक वर्ष सुरू होतील, याविषयी सांशकता व्यक्‍त केली जात आहे.

हेही वाचा - गर्भवती व दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा द्या; ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हेही वाचा - ट्रॅकींग आणि टेस्टींगही वाढवून मृत्यूदर रोखा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.