ETV Bharat / state

Abdul Sattar : शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकर संपवण्याचे निर्देश, पंचनामे वेगाने सुरू - कृषीमंत्री अब्दुल सत्तार - state cabinet directs Panchnama of losses

राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी (Panchnama of losses to farmers due to return rain) राज्य सरकारने आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची मदत दिली आहे. आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली आहे.

Abdul Sattar
अब्दुल सत्तार
author img

By

Published : Nov 3, 2022, 7:43 AM IST

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी (Panchnama of losses to farmers due to return rain) राज्य सरकारने आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची मदत दिली आहे. आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली आहे.

पंचनामे वेगाने सुरू : ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 25 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, यासाठी सुमारे 750 कोटी रुपये इतके वाटप करण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि नुकसानीसाठी हेच निर्णय लागू करण्यात येणार आहेत. यासाठी महसूल आणि कृषी विभागाला निर्देश दिले होते, त्याप्रमाणे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू असून यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचेही अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे या शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर संपावावेत, असे निर्देश देण्यात आले (state cabinet directs) आहेत.

शेतीपिकांच्या नुकसानीची दखल : दरम्यान मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिल्याप्रमाणे जून-जुलै पासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या 40 लाख 15 हजार 847 शेतकऱ्यांना सुमारे 4700 कोटींची मदत करण्यात आली आहे. ही मदत एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने जास्त व दोन ऐवजी तीन हेक्टर अशी वाढीव आहे. या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही अंतिम टप्यात आहे. लवकर याबाबत विहित नमून्यात शासनास निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त होतील. शासन शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील असून मंत्रिमंडळाने झालेल्या बैठकीत या शेतीपिकांच्या नुकसानीची दखल घेण्यात आली. ऑक्टोबर 2022 मधील या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दुप्पट दराने 3 हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचे शासनाकडून आश्वासित करण्यात आले (losses to farmers due to return rain) आहे.

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी सरकार तत्पर आहे. राज्यातला कोणताही शेतकरी मदतीविना राहणार नाही. मात्र शेतकरी मदतीच्या मुद्द्यावर काही जण राजकारण करत आहेत. सध्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय. राज्यातला कोणताही शेतकरी मदतीविना वंचित राहणार नाही, असे म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कृषिमंत्र्यांनी टोला लगावला (state cabinet directs Panchnama of losses) आहे.

उद्योग क्षेत्राबाबत संभ्रम निर्माण : राज्यातले काही प्रकल्प गुजरातमध्ये गेल्या कारणाने विरोधक सध्या राजकारण करत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकार असतानाच हे प्रकल्प राज्याच्या बाहेर करण्याचा निर्णय संबंधित उद्योजकांनी घेतला होता. मात्र आता उद्योगाच्या मुद्द्यांवरून राज्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वेदांता फॉक्स्वान प्रकल्प कोणाच्या काळात बाहेर गेला, हे माहितीच्या अधिकारातून समोर आला आहे. तसेच याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही स्पष्टीकरण दिल असल्याचं अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी यावेळी सांगितले.

श्रीकांत शिंदे सिल्लोड दौरा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघ सिल्लोड येथील दौरा सात नोव्हेंबरला करणार आहेत. ज्या दिवशी आदित्य ठाकरे सिल्लोडचा दौरा करणार आहेत, त्याच दिवशी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनाही सिल्लोड येथे आमंत्रित केले आहे, असा चिमटा आदित्य ठाकरे यांना अब्दुल सत्तार यांनी काढला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.