मुंबई - देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत. लवकरच पेट्रोलचे भाव शतक पूर्ण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला रस्त्यावर गाड्या चालवणे अशक्य होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करण्यात यावे, यामागणीसाठी विक्रोळीत राष्ट्रवादी ईशान्य मुंबई डॉक्टर सेलच्यावतीने 'गाडी बेचो' आंदोलन करण्यात आले.
'गाडी बेचो' आंदोलन -
राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्क आपल्या दुचाकी भंगारमध्ये विकण्यास नेल्या. एका हातगाडीवर दुचाकी ठेवून तिची बाजारात मिरवणूक काढत आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत राष्ट्रवादीने भंगारांचे दुकान गाठले. सध्या इंधन दरवाढीमुळे दुचाकी चालवणे शक्य नसल्याने त्या आता भंगारामध्ये विकण्यशिवाय पर्याय नसल्याचे आंदोलकांनी या वेळी सांगितले.
हेही वाचा - आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीला विरोधीपक्षाचे नेते गाझीपूर सीमेवर; सुप्रिया सुळे म्हणतात....